चैत्र शुद्ध द्वितीयेचा दिवस हा स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन (Swami Samarth Prakat Din) म्हणून साजारा केला जातो. सुमारे 19 व्या शतकामध्ये स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी हे महाराष्ट्रात वास्तव्यास होते. धार्मिक संदर्भानुसार, अक्कलकोट मध्ये खूप काळ वास्तव्य असलेले श्रीपाद वल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतर भगवान श्रीदत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार आहेत अशी अनेकांची मान्यता आहे. स्वामी समर्थांचे भक्त जगाच्या कानाकोपर्यात पोहचले आहेत. त्यांचे भक्तीचे अनेक अनुभव, किस्से लोकांना माहित आहे. पण मराठी चित्रपट, मालिका क्षेत्रामध्येही अनेक कलाकृतींमधून स्वामी समर्थांना मानवंदना देण्यात आली आहे.
सध्या मागील काही वर्ष 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतून अक्षय मुदवाडकर स्वामींची भूमिका टेलिव्हिजन वर साकारून स्वामींच्या भाविकांमध्ये गळ्यातला ताईत झाला आहे. दरम्यान यापूर्वीही अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये कलाकारांनी स्वामींची भूमिका साकरून ती अजरामर केली आहे. Shree Swami Samarth Prakat Din 2025 Messages: श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून भक्तांना शुभेच्छा देत साजरा करा मंगलमय दिवस.
राहुल सोलापूरकर
'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' या सिनेमामध्ये राहुल सोलापूरकरने स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे. बाळ निकम दिग्दर्शित हा सिनेमा आहे. यामध्ये उषा नाडकर्णी, विजय चव्हाण आदी कलाकार देखील होते.
अक्षय मुदवाडकर
View this post on InstagramA post shared by Colors Marathi (@colorsmarathi)
अक्षय मुदवाडकर सध्या मागील 5 वर्ष 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत स्वामी समर्थांची भूमिका साकारत आहे. स्वामींच्या विविध लीला या मालिकेमध्ये बघायला मिळाल्या आहेत.
मोहन जोशी
मोहन जोशी यांनी 'देऊळ बंद' मध्ये श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे. प्रविण तरडे दिग्दर्शित या सिनेमामध्ये मोहन जोशींनी साकारलेल्या या भुमिकेला देखील रसिकांनी प्रेम दिले आहे. सिनेमात स्वामींना खूपच वेगळ्या प्रकारे मांडण्यात आले आहे.
दाजी भाटवडेकर
दाजी भाटवडेकर यांनी 'तोचि एक समर्थ' मध्ये स्वामींची भूमिका साकरली आहे.
प्रफुल्ल सामंत
प्रफुल्ल सामंत यांनी 'कृपासिंधू' मालिकेत श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे. प्रफुल्ल सामंत यांनी 'तोचि एक समर्थ' या चित्रपटातही काम केले आहे, जिथे त्यांनी दाजी भाटवडेकर यांच्यासोबत काम केले आहे. दरम्यान प्रफुल्ल सामंत 'अनंतकोटी' या नाटकामध्येही स्वामींच्या भूमिकेत आहेत.