Kunal Kamra (Photo Credit X)

शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्यावर सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यानंतर सध्या राज्यात वातावरण तापलेलं असताना अजून एक गाणं सादर केले आहे. नव्या विडंबनात्मक गाण्यात शिवसैनिकांनी घातलेल्या राड्यावर त्याने बोट ठेवलं आहे. The Habitat Club स्टुडिओची तोडफोड करणार्‍या शिवसैनिकांनाही त्याने यात लक्ष्य केले आहे. 'हम होंगे कामयाब...' च्या धर्तीवर त्याने 'हम होंगे कंगाल...' म्हटलं आहे. 'विकसित भारतचं अजून एक अ‍ॅन्थम' असं म्हणत त्याने हे प्रेक्षकांसमोर गायल्याचं व्हिडिओ मध्ये दिसत आहे.

दरम्यान कुणाल कामरा ने उपमुख्यमंत्र्यांवरील गाण्यावर माफी मागण्यास नकार दिला आहे. आज त्याने पुन्हा व्हिडिओ ऑनलाइन टाकताच, त्याला इंटरनेटवरील एका वर्गाकडून मोठा पाठिंबा मिळाला, जो विनोदी कलाकाराच्या त्याच्या आधीच्या गाण्याबद्दल एकनाथ शिंदे यांची माफी न मागण्याच्या निर्णयाचे समर्थन करत होता. (हेही वाचा, Kunal Kamra Controversy: कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील 'गद्दर' वक्तव्याबद्दल मुंबई पोलिसांनी बजावले समन्स).

कुणाल कामराचं 'हम होंगे कंगाल...' गाणं

कुणालची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदेंवरील विडंबनात्मक गाण्याच्या वादावर प्रतिक्रिया देताना, कामरा यांनी स्टुडिओची तोडफोड केल्याबद्दल शिवसैनिकांवर टीका केली. "नेत्यांवर आणि राजकीय व्यवस्थेची खिल्ली उडवणे कायद्याच्या विरोधात नाही." असं त्याने काल जारी निवेदनामध्ये म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी माग अन्यथा कडक कारवाईला सामोरं जा अशी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनीही अशाप्रकारे टीका करणं, मस्करी करणं हे म्हणजे सुपारी घेऊन बोलण्यासारखं आहे. त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांनीही कुणालचे फोन कॉल तपशील, बॅंक अकाऊंट्स सारं तपासलं जाईल असे म्हटलं आहे.