Video: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एका खासगी बसला भीषण आग लागली. या बसमध्ये 17 प्रवासी होते, सर्व प्रवासी वेळेत बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले. टायर फुटल्याने बसला आग लागली.बस हैदराबादहून पुण्याला जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर महामार्गावरील कदमवाकबस्ती गावाजवळील एका हॉटेलसमोर बसला आग लागली. आग लागल्यानंतर बसमधील प्रवासी घाबरले, आग लागल्याचे समजताच चालकाने सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. सर्व प्रवासी बसमधून बाहेर पडताच बस जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.हेही वाचा:Pune Bus Fire Video: पुण्यात लक्झरी बसला आग, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)