
Who Is Jasmin Walia?: हार्दिक पंड्या हा नेहमी चर्चेत असतो. आधी कॉफी विथ करण शोमध्ये वादग्रस्त विधान, नंतर नताशा स्टॅन्कोविकसोबत प्रेम प्रकरण, दोघांच लग्न, त्यानंतर काही वर्षातच घटस्फोट आणि आता जास्मिन वालिया हिला डेट करत असल्याच बोलल जात आहे. हार्दिक-जास्मिन वालिया एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत असतानाच, जास्मिन वालिया (Hardik Pandya Girlfriend Jasmin Walia) ही काल थेट मुंबई विरुद्ध केकेआरच्या सामन्यात प्रेक्षकांच्या गर्दीत दिसली. स्टँडमध्ये ती दिसताच कॅमेरामनने तिच्यावर कॅमेरा फिरवला. तेव्हा जॅस्मिननेही स्टँडवरून फ्लाइंग किसही दिले. तिच्या स्टाईल आणि स्टायलिश लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. जास्मिनच्या उपस्थितीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर जस्मिन आणि हार्दिकच्या (Hardik Pandya) नात्याबद्दल अफवा पसरू लागल्या. परंतु दोघांपैकी कोणीही अद्याप याबद्दल काहीही सांगितले नाही. मात्र, चाहत्यांना जास्मिन वालिया कोण आहे? हे जाणून घ्यायची तीव्र इच्छा आहे.
जास्मिन वालिया कोण आहे?
जास्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका, अभिनेत्री आणि टीव्ही कलाकार आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. जास्मिनने अनेक पंजाबी आणि इंग्रजी गाण्यांना आपला आवाज दिला आहे. ब्रिटीश रिअॅलिटी शो 'द ओन्ली वे इज एसेक्स' मधून जास्मिनला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याशिवाय, कार्तिक आर्यनच्या 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटात तिचे 'बम डिगी डिगी' हे गाणे देखील आहे. हे गाणे खूप व्हायरल झाले. तिचे इंस्टाग्रामवर 714 हजार फॉलोअर्स आहेत. ती स्वत: 668 लोकांना फॉलो करते. ती इंस्टाग्रामवर हार्दिक पांड्याला फॉलो करते आणि त्याच्या पोस्ट देखील लाईक करते.
Hardik Pandya Rumoured Girlfriend Jasmin Walia in stands #MIvsKKR pic.twitter.com/em8RJoUQc1
— Jeet (@JeetN25) March 31, 2025
हार्दिक पांड्या जास्मिन वालियाला डेट करतोय?
हार्दिक आणि नताशा स्टॅन्कोविक यांचा घटस्फोट झाल्यानंतर काही दिवसातच हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया यांच्या नात्याबद्दल अफवा सुरू झाल्या. दरम्यान दोघांनीही नात्याबद्दल कोणतीही पुष्टी केलेली नाही. जेव्हा हार्दिक पांड्या सुट्टीसाठी ग्रीसला गेला. तेव्हा त्यांच्या प्रेमाच्या अफवा सुरू झाल्या. त्यानंतर सोशल मीडियावरील संवाद आणि ग्रीसमधील दोघांच्या फोटोंमुळे त्यांच्या डेटिंगच्या अफवांना आणखी बळकटी मिळाली. हार्दिकचे आधी नताशा स्टॅन्कोविकशी लग्न झाले होते, पण आता दोघेही विभक्त झाले आहेत. त्यांना एक मुलगा आहे. त्याच नाव अगस्त्य आहे. तो सध्या नताशसोबत राहतो.