
Director Sanoj Mishra Arrested: महाकुंभ मेळ्यात (Mahakumbh Mela) व्हायरल गर्ल मोनालिसा (Viral Girl Monalisa) ला चित्रपट ऑफर करणाऱ्या दिग्दर्शक सनोज मिश्राला (Director Sanoj Mishra) बलात्कार प्रकरणात (Rape Case) अटक (Arrest) करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळल्यानंतर, त्याला दिल्लीच्या नबी करीम पोलिस ठाण्याने अटक केली. अभिनेत्री बनू इच्छिणाऱ्या एका छोट्या शहरातील एका तरुणीवर सनोज मिश्राने अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, 2020 मध्ये तिची टिकटॉक आणि इंस्टाग्रामद्वारे सनोज मिश्राशी ओळख झाली. त्यावेळी ती झाशीमध्ये राहत होती. दोघांमधील संभाषण काही वेळ चालू राहिले आणि त्यानंतर दिग्दर्शकाने तिला 17 जून 2021 रोजी फोन करून सांगितले की तो झाशी रेल्वे स्टेशनवर पोहोचला आहे. सामाजिक दबावामुळे पीडितेने त्याला भेटण्यास नकार दिल्यावर आरोपी सनोज मिश्राने आत्महत्या करण्याची धमकी दिली. यानंतर, भीतीपोटी, पीडिता त्याला भेटायला गेली. दुसऱ्या दिवशी, 18 जून 2021 रोजी, आरोपीने तिला पुन्हा फोन करून रेल्वे स्टेशनवर बोलावले आणि आत्महत्या करण्याची धमकी दिली. (हेही वाचा - Monalisa Bhosle: कोण आहे मोनालिसा भोसले? हा चेहरा का खेचतोय महाकुंभ मेळ्यातील गर्दी?)
तरुणीला चित्रपटांमध्ये काम देण्याचे आमिष -
त्यानंतर आरोपीने तिला एका रिसॉर्टमध्ये नेले आणि तिला नशा करणारे पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेने एफआयआरमध्ये म्हटले आहे की, आरोपीने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवले आणि विरोध केल्यास ते सार्वजनिक करण्याची धमकी दिली. यानंतर त्याने तिला लग्नाच्या बहाण्याने अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच, त्याने तिला चित्रपटांमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून आकर्षित केले. (हेही वाचा, Maha Kumbh 2025: लोकप्रियतेला कंटाळलेले महाकुंभाचे चार व्हायरल चेहरे; कॅमेऱ्यासमोर व्यक्त केला संताप (पाहा व्हिडिओ))
सनोज मिश्राने मोनालिसाला दिली होती ऑफर -
दरम्यान, महाकुंभात मणी विकून सोशल मीडियाची क्विन बनलेल्या मोनालिसावर चित्रपट बनवला जाणार असल्याची बातमी आधी आली होती. चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी त्यांच्या पुढच्या 'द डायरी ऑफ 2025' या चित्रपटात मोनालिसाला घेण्याची घोषणा केली होती. सनोज मिश्रा मोनालिसाला अभिनयाचे प्रशिक्षण देत होते.
अलिकडेच मोनालिसा सनोज मिश्रासोबत विमानात प्रवास करताना दिसली. अशा परिस्थितीत, सनोज मिश्रा मोनालिसाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप अनेक ठिकाणी केले जात होते. या आरोपांना सनोज मिश्रा यांनी योग्य उत्तर दिले होते. सनोज मिश्रा म्हणाले होते की, जेव्हा त्यांना कळले की कुंभमेळ्यात मोनालिसा नावाची मुलगी व्हायरल होत आहे, तेव्हा त्यांनी तिला पहिल्यांदा पाहिले. मोनालिसाभोवती गर्दी होती आणि लोक तिच्यावर रील्स बनवत होते पण कोणीही त्या गरीब मुलीला मदत केली नाही.