Solapur Horror: टोल टाळण्यासाठी ओव्हरस्पीड ट्रकने कर्मचाऱ्याला चिरडून ठार मारले; सोलापूरमधील धक्कादायक घटना, व्हिडीओ व्हायरल (Watch)

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, टोल नाक्यावर कर्मचारी उभे आहेत, इतक्यात एक ट्रक भरधाव वेगाने येतो आणि कर्मचाऱ्यांना धडक देतो.

Solapur Horror: टोल टाळण्यासाठी ओव्हरस्पीड ट्रकने कर्मचाऱ्याला चिरडून ठार मारले; सोलापूरमधील धक्कादायक घटना, व्हिडीओ व्हायरल (Watch)
ओव्हरस्पीड ट्रकने कर्मचाऱ्याला चिरडून ठार मारले

राज्यातील सोलापूर येथून एका भीषण अपघाताची बाब समोर आली आहे. या ठिकाणी टोल भरणा टाळण्याच्या प्रयत्नात ट्रकने टोल प्लाझावरील कर्मचाऱ्याला चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ ते पंढरपूर या मार्गावर आज पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. टोल प्लाझावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा गुन्हा कैद झाला आहे. हे फुटेज सोशल मीडियावर समोर आले आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, टोल नाक्यावर कर्मचारी उभे आहेत, इतक्यात एक ट्रक भरधाव वेगाने येतो आणि कर्मचाऱ्यांना धडक देतो. त्यानंतर तो तिथून पलायन करतो. या घटनेत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार, या घटनेत पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरु आहे. या घटनेने राज्यातील रस्ता सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (हेही वाचा: UP Accident Video: भरधाव कारची टोल प्लाझा कर्मचाऱ्याला धडक, घटना सीसीटीव्ही कैद)

ओव्हरस्पीड ट्रकने कर्मचाऱ्याला चिरडून ठार मारले-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 09, 2024 08:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).