UP Accident Video: उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भरधाव कारने टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्याला धडक दिली आहे. या धडकेत कर्मचारी हवेत कर्मचारी हवेत उडाला आहे. ही घटना टोल बुथवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दिल्ली- लखनौ महामार्ग 9 वरिल पिलखुवा कोतवाली भागातील छिजारसी टोल प्लाझा येथे ही घटना घडली आहे. (हेही वाचा- चालत्या बसमधून तरुणाचा तोल गेला, कंडक्टरने वाचवला प्रवाशाचा जीव
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे. हेमराज असं जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, हेमराज काम करत असताना अचानक एक भरधाव कार त्यांच्या दिशेने आली. ब्रेक न मारता कार पुढे निघून गेली. यात कारने कर्मचारी हेमराजला धडक दिली. या धडकेत ते हवेत उडाले आणि काही फूट उंचावर उडाले. घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगत आहे.
यूपी : दिल्ली-लखनऊ हाईवे पर हापुड़ जिले में टोल प्लाजा पर कल रात तेज रफ्तार कार ने टोल कर्मचारी हेमराज को हवा में उड़ा दिया। टोलकर्मी की हालत गंभीर है, कार सवार की तलाश जारी है। pic.twitter.com/Tak5Zscq1A
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) June 7, 2024
या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. कार चालक अद्याप फरार आहे. पोलिसांकडून कारचालकाचा शोध सुरु आहे. पोलिस सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.