LPG Gas Cylinder Rates Revised: व्यावसायिक गॅस सिलेंडर 41 रूपयांनी स्वस्त; घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थे
19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत मुंबईत 1714.50 रुपये झाली आहे, जी पूर्वी 1755.50 रुपये इतकी होती.
तेल कंपन्यांनी आज नव महिन्याच्या पहिल्या दिवशी किंमतींमध्ये बदल केले आहेत. आज महिन्याच्या सुरूवातीला जाहीर झालेल्या किंमतींनुसार, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये 41 रूपयांनी घट झाली आहे. म्हणजे आता हॉटेल्स, रेस्टॉरंट्स मधील गॅस सिलेंडर्स स्वस्त होणार आहेत तर घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत मुंबईत 1714.50 रुपये झाली आहे तर 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 802. 50 रुपये राहणार आहे.
Oil marketing companies have revised the prices of commercial LPG gas cylinders.
The rate of a 19 kg commercial LPG gas cylinder has been reduced by Rs 41, effective today. In Delhi, the retail sale price of a 19 kg commercial LPG cylinder is Rs 1762 from today.
— ANI (@ANI) April 1, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 01, 2025 08:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

