
पुण्यामध्ये तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार आणि दोनदा केल्याच्या घटना समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी हा एका माजी नगरसेविकेच्या मुलगा आहे. या आरोपी मुलाविरूद्ध पीडीतेने गुन्हा नोंदवला आहे. पुण्यात भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांची एका जीम मध्ये ओळख झाली. 2021 नंतर त्यांचे ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. आरोपीने तरूणीला जाळ्यात ओढले. तो तिला भेटण्यासाठी घरी देखील जात होते.
आरोपीचे अन्य तरूणीसोबतही प्रेमसंबंध असल्याचा तिला संशय आला. तिने जबाब विचारल्यानंतर आरोपीने तिला शिव्या दिल्या, मारहाण करून धमकावले. मारहाणीनंतर तरूणीने त्याच्याशी बोलणं बंद केले. तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिचा दोनवेळा जबरदस्तीने गर्भपात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
लग्नापूर्वीच त्यांचे संबंध असल्याने दोनदा पीडीतेचा गर्भपात करण्यात आला. आता पुन्हा तरूणी गरोदर असताना तिने तक्रार करू नये म्हणून घरातील लोकांना न कळवता त्या तरूणीशी आळंदी मध्ये लग्न केले. पण लग्नानंतर तिला घरी न नेता गरोदर असताना मारहाण केली. पीडीत तरूणी या मारहाणीनंतर पोलिस स्टेशन मध्ये पोहचली आणि तिने तक्रार नोंदवली. नक्की वाचा: Mumbai Rape Case: गोरेगाव च्या बांगूर नगर मध्ये 40 वर्षीय व्यक्तीचा घराकाम करणार्या महिलेवर बलात्कार .
पीडीत तरूणी 28 वर्षीय असून आंबेगाव मध्ये राहणारी आहे. तिचा व्यवसाय देखील आहे. पीडीतेच्या तक्रारीनंतर आरोपीने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. पीडीतेच्या वकिलाकडून आता त्यांची बाजू ऐकल्याशिवाय आदेश देऊ नये यासाठी अर्ज दाखल केला आहे.