
मुंबई मध्ये घरकाम करणार्या बाईवर बलात्कार करून आरोपी पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बांगूर नगर भागातील आहे. 35 वर्षीय महिलेने बलात्काराची तक्रार पोलिस स्टेशन मध्ये केली आहे. मागील 15 दिवसांमध्ये या महिलेवर 40 वर्षीय व्यक्तीने दोनदा बलात्कार केल्याचा दावा आहे. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास शारिरीक त्रास दिला जाईल अशी धमकी देखील दिली होती. दरम्यान घरातील मंडळी बाहेर गेल्याने एकटाच असलेल्या या आरोपीने संधीचा फायदा घेतला. सध्या आरोपी विरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पहिल्या दिवशी बलात्कारानंतर पीडीत घाबरलेल्या अवस्थेमध्ये होती. तिने कुठेही याबद्दल बोलणं टाळलं. तिच्या गप्प बसण्याचा फायदा घेत दुसर्या दिवशीही त्याने अत्याचार केला. तिसर्या दिवशी तिने कामावर जाणं टाळलं.
अचानक काम का सोडलं? असा प्रश्न पीडीतेला घरच्यांनी विचारला त्यानंतर तिनं घडला प्रकार सांगितला. पीडीतेच्या कुटुंबाने नंतर तातडीने बांगूर नगर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. नक्की वाचा: TV Actresses Molestation Case in Mumbai: मुंबई मध्ये होळी पार्टीत सह कलाकाराकडून विनयभंग झाल्याचा अभिनेत्रीचा दावा; पोलिसांत तक्रार दाखल.
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, शहरात २०२४ मध्ये १,०५१ बलात्कारांची नोंद झाली, तर २०२३ मध्ये ही संख्या ९७३ होती. २०२४ मध्ये मुंबईत छेडछाडीच्या घटना २,०५५ च्या तुलनेत २०२४ मध्ये २,३९७ वर पोहोचल्या. त्याचप्रमाणे, २०२३ मध्ये नोंदवलेल्या १,१०८ प्रकरणांवरून २०२४ मध्ये मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना १,३४१ वर पोहोचल्या - ही वार्षिक वाढ २१ टक्क्यांनी असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.
Women and Child Helpline Numbers: Childline India – 1098; Missing Child and Women – 1094; Women’s Helpline – 181; National Commission for Women Helpline – 112; National Commission for Women Helpline Against Violence – 7827170170; Police Women and Senior Citizen Helpline – 1091/1291.