Fastag (Photo Credits: Twitter)

एमएसआरडीसी (MSRDC) कडून 1 एप्रिल पासून राज्यात सार्‍या टोल प्लाझा (Toll Plaza) वर FASTag किंवा E-Tag बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्या गाडीला अजूनही फास्ट टॅग नसेल तर येत्या 15 दिवसांत हा फास्टटॅग बनवू घ्यायला विसरू नका. जर फास्टटॅगच्या माध्यमातून तुम्ही टोल भरू शकला नाहीत तर कार्ड, कॅश, यूपीआय च्या माध्यमातून टोल भरणं हे तुम्हांला महाग पडू शकतं. तुम्हांला दुप्पट टोल टॅक्स आकारला जाणार आहे. त्यामुळे अजूनही तुमच्या वाहनावर फास्टटॅग नसल्यास तो बनवू घ्यायला आता तुमच्याकडे फत 15 दिवसांचा अवधी आहे.

महाराष्ट्रात मुंबई मधील पाच एन्ट्री पॉईंट्स वर म्हणजे दहिसर, मुलूंड ईस्ट, वेस्ट, ऐरोली आणि वाशी टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोल आकारला जात नाही. पण या टोलनाक्याशिवाय MSRDC च्या अख्यत्यारित येणार्‍या वांद्रे वरळी सी लिंक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, जुना मुंबई पुणे हायवे, मुंबई-नागपूर समृद्धी एक्सप्रेस वे, नागपूर इंटिग्रेटेड रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, सोलापूर इंटिग्रेटेड रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, छत्रपती संभाजी नगर इंटिग्रेटेड रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, काटोल बायपास आणि चिमूर-वरोरा-वणी महामार्ग याठिकाणी 1 एप्रिल पासून प्रवास करताना फास्टटॅगच्या माध्यमातून टोल भरावा लागणार आहे. नक्की वाचा: High Security Number Plates: हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसवण्यासाठी 31 मार्चची अंतिम मुदत; Maharashtra Transport Department ने जारी केली मार्गदर्शक तत्वे .

फास्टटॅग कसा बनवायचा?

फास्टटॅग ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही मार्गाने बनवता येऊ शकतो. आरटीओ (RTO) कार्यालय, सेवा केंद्र, वाहतूक केंद्र आणि काही निवडक पेट्रोल पंपांवर आणि काही बॅंकांमध्ये फास्ट टॅग उपलब्ध असतात. बँका, इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासारख्या ठिकाणी फास्टॅगच्या विक्रीसाठी विशेष विक्री केंद्र आहेत. My FASTag App वर सार्‍या केंद्रांची माहिती मिळणार आहे. fastag.org/apply-online वेबसाईटही अर्ज करण्याची सोय आहे.

फास्ट टॅग साठी आवश्यक कागदपत्र

फास्ट टॅग साठी तुम्हांला गाडीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच RC बूक, गाडीच्या मालकाचा पासपोर्ट साईझ फोटो आणि ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. रहिवासी पत्त्याच्या पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा व्होटर आयडी देखील आवश्यक आहे.

टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि एक्सप्रेस वे वर वाहतूक वेगवान होण्यासाठी फास्टटॅग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. हा फास्टॅग एखाद्या स्टिकरसारखा असून कारच्या पुढच्या काचेवर लावला जातो. टोल नाक्यावर पैसे न देता हा टॅग स्कॅन करून आपोआप पैसे कापले जातात.