Toll | Image used for representational purpose only. | Image Courtesy: Wikimedia Commons

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भारताच्या टोल जमा करण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल होणार असल्याची माहिती दिली आहे. आता फास्टटॅग जी Radio Frequency Identification पद्धतीद्वारा टोल वसुली करते ती रद्द बादल करून GPS-based अ‍ॅटोमेटिक टोल वसुली करणारी पद्धत अंमलात आणण्याच्या विचारामध्ये आहे. नव्या पद्धतीमुळे आता टोल जमा करणं सुकर होणार आहे. यामुळे प्रवाशांचाही वेळ वाचणार आहे. टोल वसुली मुळे टोल नाक्यांवर वाहनांची लांबच लांब रांग लागत होती या समस्येमधूनही नागरिकांची नव्या प्रक्रियेमुळे सुटका होणार आहे.

English Jagran,च्या रिपोर्टनुसार, फास्टटॅग लवकरच जाऊन त्याऐवजी जीपीएस बेस्ड टोल कलेक्शन येणार आहे. नव्या सिस्टीम मध्ये मायक्रो कंट्रोलर्स असनार आहेत. जे 3जी आणि जीपीएसकनेक्टिव्हिटी द्वारा वाहनांना जोडले जातील. या यंत्रणेद्वारा वाहनांचा रस्ता देखील ट्रॅक करू शकणार आहे. या अंतरावरून एकूण किती टोल आकारला जाणार याचं देखील गणित मांडलं जाणार आहे.

Global Positioning System अर्थात जीपीएस वापरून टोल जमा करण्याची प्रक्रिया आता कमी किचकट केली जाणार आहे. FASTag system,मध्ये वाहनांवर स्टिकर्स लावली जातात. टोल नाक्यावर ती स्कॅन केली जातात. जीपीएस मध्ये वाहन कुठे होतं याचा तपशील मिळणार आहे. यामध्ये कुठल्याही टोल बुथ वर वाहनांना थांबायची गरज नाही ती ट्रॅक केली जातील. Nitin Gadkari On Diesel Vehicles GST: डिझेल वाहन विक्रीवर 10% GST? नितीन गडकरी यांच्याकडून तातडीने स्पष्टीकरण .

नव्या प्रणालीमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि टोल वसुली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल अशी अपेक्षा आहे. प्रत्येक वाहन ज्या मार्गावरून जाते ते अचूक मार्ग आणि टोल गेट्स ट्रॅक करून, GPS-आधारित प्रणाली अधिक अचूकपणे टोल आकारू शकते. वाहनांमध्ये 3G आणि GPS कनेक्टिव्हिटीसह मायक्रोकंट्रोलर देशाच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये अधिक अत्याधुनिक तंत्रज्ञान एकत्रित करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे असेल.