
Chhaava Box Office Collection Day 45: विक्की कौशल (Vicky Kaushal) स्टारर 'छावा'नं (Chhaava) आपली कमाईची घौडदौड सुरू ठेवलेली आहे. च्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथेवर आधारित चित्रपटानं 602.11 कोटी रुपये कमावले. 'छावा' रिलीज होऊन 45 दिवस उलटले आहेत. 45 दिवसांनंतरही 'छावा' बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करत आहे. सॅक्निल्कच्या आकडेवारीनुसार, सहाव्या आठवड्यात 16.3 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटानं 602.11 कोटी रुपये कमावले आहेत.
चित्रपटानं 45व्या दिवशी, सकाळी 10:40 वाजेपर्यंत, चित्रपटानं 1.15 कोटी रुपये कमावले आहेत आणि चित्रपटाची एकूण कमाई 606.41 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. चित्रपटानं 43 व्या दिवशी 1.15 कोटी रुपये कमावले आणि शनिवारी, म्हणजेच 44 व्या दिवशी, कमाईत वाढ झाली आणि कमाई 2 कोटी रुपयांवर पोहोचली. तर,हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतो.
'छावा'वर 'सिकंदर'चा कोणताही परिणाम नाही
'छावा' अजूनही सिनेमागृहात धामाकूळ घालत आहे. दरम्यान, आता सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिकंदर' रिलीज झाला आहे. 'सिकंदर'च्या रिलीजचा कोणताही परिणाम 'छावा' वर झालेला नाही. दरम्यान, 'छावा' फक्त 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. चित्रपटात विक्की कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना आणि विनित कुमार सिंह यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.