
WhatsApp हे जगभर वापरलं जाणारं आघाडीचं मेसेजिंग अॅप आहे. त्यामुळे वेळोवेळी या अॅपसोबत ग्राहक जोडले जावेत यासाठी विविध अपडेट्स आणले जातात. आता नव्या अपडेट नुसार, WhatsApp Status ला आता अधिकृतपणे म्युझिक सपोर्ट मिळाला आहे. त्यामुळे युजर्स इंस्टाग्रामपणे व्हॉट्सअॅप स्टेटसलाही आवडीची गाणी ठेवू शकतात. जगभर टप्प्याटप्य्याने युजर्सना हे अपडेट येत्या काही आठवड्यात दिले जाणार आहे.
Status Updates हे मुळात स्टोरीजचे व्हॉट्सअॅप व्हर्जन असते जे त्या व्यक्तीच्या प्रोफाइल पिक्चरवर दिसते. जेव्हा तुम्ही टॅप करता तेव्हा तुम्हाला इंस्टाग्राम स्टोरीज आणि स्नॅपचॅट फीचर्स प्रमाणेच काही काळानंतर गायब होणाऱ्या इमेजेस किंवा शॉर्ट क्लिप्स दिसतात.
WhatsApp Status With Music काम कसं करणार?
व्हॉट्सअॅप ने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन फीचरमुळे तुम्हाला लाखो गाण्यांच्या लायब्ररीतून संगीत तुमच्या फोटोसोबत जोडता येईल. आता तुम्ही नवीन स्टेटस तयार करता तेव्हा तुम्हाला तुमच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला एक संगीत नोट दिसेल. तुमच्या स्टेटसमध्ये जोडण्यासाठी उपलब्ध असलेल्या गाण्यांची/ट्रॅकची लिस्ट पाहण्यासाठी तुम्ही त्यावर टॅप करू शकता. WhatsApp तुम्हाला ट्रॅकची एक छोटी क्लिप निवडण्याची परवानगी देईल जी फोटो अपडेटसाठी 15 सेकंदांपासून ते तुमच्या स्टेटसमध्ये व्हिडिओ जोडत असल्यास 60 सेकंदांपर्यंत असेल.
WhatsApp ने अलीकडेच आयफोन युजर्ससाठी त्यांचे डीफॉल्ट कॉलिंग अॅप बदलणे सोपे केले आहे. iOS 18.2 अपडेटनंतर, मेसेजिंग अॅप युजर्सना WhatsApp ला त्यांचे डीफॉल्ट मेसेजिंग आणि कॉलिंग अॅप म्हणून सेट करण्याची परवानगी देते, म्हणजेच जेव्हा ते फोन नंबर किंवा मेसेज बटण टॅप करतात तेव्हा iPhone बिल्ट-इन फोन किंवा मेसेजेस अॅप्सऐवजी WhatsApp आपोआप लाँच करेल.