Shivaji Maharaj Punyatithi | File Image

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 दिवशी किल्ले रायगडावर झाला. यंदा शिवरायांचा 345 वा स्मृतिदिन आहे. प्रजाहितदक्ष राजा म्हणून शिवरायांची ओळख आहे. त्यांच्या धाडसाच्या, शौर्याच्या कथा देशा-परदेशात आजही अनेकांसाठी प्रेरणा आहेत. मग शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधत आपल्या राजाचा इतिहास पुढल्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी आणि शिवरायांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी WhatsApp Messages, Facebook Messages, Status, Quotes शेअर करत त्यांना अभिवादन करा.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर झाला. शिवाजी महाराज आई जिजाबाई यांच्या देखरेखीखाली वाढले. विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध, मुघल साम्राज्याविरुद्ध शिवाजी महाराजांनी लढाया लढून त्या जिंकल्या. गनिमी काव्याने शत्रूंशी सामना करत मूठभर मावळ्यांच्या मदतीने शिवरायांनी परकीय आक्रमणं परतून लावली. त्यांनी हिंदुस्थानामध्ये मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. मग अशा रयतेच्या राजाला आज नक्कीच अभिवादन करा.

छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

Shivaji Maharaj Punyatithi | File Image
Shivaji Maharaj Punyatithi | File Image
Shivaji Maharaj Punyatithi | File Image
Shivaji Maharaj Punyatithi | File Image
Shivaji Maharaj Punyatithi | File Image

शिवरायांनंतर हिंदवी स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांनी सांभाळलं.शिवरायांप्रमाणेच संभाजी महाराजांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याचे रक्षण केले आणि साम्राज्याचा विस्तार केला.