पॅलेट गनपीडित तरुण म्हणून पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल बासित यांनी Retweet केला पॉर्न स्टार Johnny Sins याचा फोटो
पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित (डावीकडून) आणि पॉर्न स्टार जॉनी सिन्स | (Photo Credit: ANI)

पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित (Abdul Basit) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो रि-ट्विट केला. मात्र, हा फोटो रि-ट्विट करणे त्यांच्या चांगलेच आंगलट आले आहे. अब्दुल बासित (Abdul Basit) यांनी सोशल मीडयावर पॅलेट गण हल्ल्याचा दावा करत एक फोटो शेअर केला. पण, धक्कादायक असे की, अब्दुल बसित यांनी जो फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला होता तो चक्क एका पॉर्न स्टारचा होता. पॉर्न स्टार Johnny Sins याचा फोटो शेअर केल्यामुळे आता अब्दुल बासित भलतेच अडचणीत आले आहेत. सोशल मीडियावरही त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

दरम्यान, पॉर्न स्टार Johnny Sins याचा फोटो रिट्विट करत अब्दुल बासित यांनी दावा केला की, हा व्यक्ती अनंतनाग येथील पॅलेट गन वापरामुळे आपली दृष्टी गमावणार आहे. या ट्विटमुळे सोशल मीडियावर अब्दुल बासित यांना जोरदार ट्रोल केले जात आहेच. पण, अनेक युजर्स त्यांची खिल्ली उडवत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीही करत आहेत. दरम्यान, घडला प्रकार लक्षात आल्यानंतर अब्दुल बासित यांनी आपले ट्विट डिलिट केले आहे.

नायला इनायत ट्विट

एक ट्विटर युजर नायला इनायत यांनी ट्विट करुन हा प्रकार समोर आणला. त्यांनी स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले की, माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीरी युवक असा उल्लेख करत चुकून पॉर्न स्टार जॉनी सिन्स याचा फोटो शेअर केला. ट्विटध्ये अब्दुल बासित यांनी रिट्विटमध्ये म्हटले आहे की, हा व्यक्ती काश्मीर येथील अनंतनाग येथील पॅलेट गनचा बळी असून, लवकरच त्याला आपली दृष्टी गमवावी लागणार आहे. दरम्यान, आता नायला याचेही ट्विट व्हायरल होऊ लागले आहे. (हेही वाचा, हातात अजगर, शेजारी मगर घेऊन भडकली पाकिस्तानी गायिका Rabi Pirzada; भारतीय आणि पीएम नरेंद्र मोदींना दिली साप हल्ल्याची धमकी (Video))

एएनआय ट्विट

दरम्यान, अब्दुल बासित यांनी जो फोटो रिट्विट केला आहे त्याचा उल्लेख युसूफ असा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात तो पॉर्न इडस्ट्रीतील सुपरस्टार जॉनी सिन्स आहे. त्याच्यासोबत फोटोत दिसणारी मुलगीही पॉर्नस्टारच आहे. हे पहिल्यांदाच घडले नाही. जम्मू-कश्मिरमधून कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानकडून अनेक फेक न्यूज प्रसारित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ट्विटरनेही जम्मू कश्मीरच्या राष्ट्रपतींकडे फेक न्यूज सरवल्या जाऊ नयेत याबाबत निर्देश केले होते.