बलात्काराचा गुन्हा हा खुनापेक्षाही गंभीर, उच्च न्यायालयाने फेटाळली शक्तीमिल बलात्कार प्रकरणी आरोपींची याचिका
Shakti mill (Photo Credits: File Photo)

बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, त्याचे गंभीर स्वरुप लक्षात घेता उच्च न्यायालयाने (High Court) एक महत्त्वपुर्ण असा निर्णय दिला आहे. बलात्काराचा गुन्हा हा खुनापेक्षाही गंभीर आहे, असे स्पष्ट करत सलग दुसऱ्यांदा बलात्काराच्या गुन्ह्य़ात दोषी ठरलेल्यांना जन्मठेप वा फाशीची शिक्षा योग्यच असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. तसेच शक्तीमिल बलात्कार प्रकरणातील (Shakti Mill Rape case) आरोपींची याचिका फेटाळताना न्यायालयाने हा निर्वाळा दिला.

दिल्ली येथील २०१२ सालच्या निर्भया प्रकरणानंतर कायद्यात दुरूस्ती करण्यात आली. त्यानुसार सलग दुसऱ्यांदा बलात्काराच्या गुन्ह्य़ात दोषी ठरलेल्यांना जन्मठेप वा फाशीची तरतूद करण्यात आली. शक्तीमिल येथे वृत्तछायाचित्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पहिल्यांदाच या नव्या कायद्यानुसार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र फाशीची शिक्षा झालेल्या विजय जाधव, कासिम बंगाली आणि सलीम अन्सारी यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात अपिल दाखल केले. त्याचवेळी नव्या कायद्याच्या वैधतेलाही आव्हान दिले आहे.

दिल्लीमध्ये 2012 मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर कायद्यात अनेक दुरुस्ती करण्यात आल्या होत्या. त्या दुरुस्ती नंतर सलग दुस-यांदा बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्यांना जन्मठेप किंवा फाशीची तरतूद करण्यात आली. त्यानुसार शक्तीमिल बलात्कार प्रकरणातील आरोपींना नवीन कायद्यानुसार, फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र या आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने सोमवारी त्यांची कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावताना नवा कायदा योग्य ठरवला.

विरार: मित्राला झाडाला बांधून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी एक आरोपी अटकेत

तसेच न्यायालयाने निकालपत्रात असेही म्हटले आहे, की बलात्कारामुळे पीडित महिलेच्या शारीरिक आणि मानसिक आघात होतो आणि तो आयुष्यभरही तसाच राहतो. त्यामुळे हा गुन्हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. बलात्कार हा केवळ शरीरावरील हल्लाच नाही, तर त्यामुळे संबंधित महिलेचे आयुष्य प्रभावित होते, असेही न्यायालयाने म्हटले आहे.