विरार: मित्राला झाडाला बांधून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी एक आरोपी अटकेत

मित्रासोबत बोलत बसलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना विरार मधून समोर आली आहे.

विरार: मित्राला झाडाला बांधून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी एक आरोपी अटकेत
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मित्रासोबत बोलत बसलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी विरार मधून समोर आली होती. या प्रकरणी विरार पोलिसांनी एकाला अटक केली असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. सोबत असलेल्या मित्राला झाडाला बांधून त्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. पीडित मुलगी 15 वर्षांची आहे. (विरार येथे मित्राला झाडाला बांधून, अल्पवयीन मुलीवर दोन इसमांचा सामुहिक बलात्कार; गुन्हा दाखल, चौकशी सुरु)

15 एप्रिल रोजी विरार येथील जीवदानी रोडवरील भास्कर वामन ठाकूर शाळेच्या मागील रस्त्यावरुन पीडित मुलगी आपल्या बहिणीकडे जात होती. तेवढ्यात वाटेत तिला तिचा मित्र भेटला आणि ते दोघे बोलत बसले होते. तेव्हाच दोन अज्ञात इसमांनी पीडित मुलीच्या मित्राला मारहाण करत झाडाला बांधून मुलीवर बलात्कार केला.

घटनेनंतर आरोपी अकलूज या आपल्या गावी लपला होता. पोलिसांनी तपास करत तेथून त्याला शोधून काढले तर त्याचा साथीदार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र दुसरा आरोपी देखील लवकरच पकडला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 02, 2019 08:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).