सिंगल असलेल्यांना वा आपला जोडीदार आपल्यासोबत नसलेल्यांना अनेकदा हस्तमैथुन (Masturbation) करण्याची सवय असते. हस्तमैथुन हा एक प्रकारची उत्तेजिता वाढविण्यासाठी केलेला प्रकार असतो. तसेच एखादा अॅडल्ट चित्रपट, पॉर्न फिल्म, बोल्ड फोटोज, व्हिडिओज पाहून तुम्ही उत्तेजित झाला असाल तर स्वत:ला त्वरित Satisfaction देण्यासाठी केलेला हा प्रकार असतो. यात दुस-याची व्यक्तीची गरज नसते वा संभोगाचीही गरज नसते. स्वत:च्या हातांनी आपण स्वत:ला उत्तेजित करु शकतो. मात्र याचे अनेक फायदे आणि तोटे आहेत. त्याशिवाय हा प्रकार करताना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
सर्वात आधी हस्तमैथुन ही वाईटच गोष्ट आहे असा विचार मनातून काढून टाका. केवळ ते करताना आपण कुठे आहोत वा आपल्या बाजूला कुणी नाही याचे भान ठेवून हा प्रकार पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी हा प्रकार करणे देखील चुकीचे आहे. सध्या कोरोनाच्या काळात तर जोडीदारासोबत संभोग करण्यापेक्षा हस्तमैथुनावर भर द्या असे सल्ले देण्यात येत होते. मात्र हस्तमैथुन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेणे विशेष गरजेचे आहे.हेदेखील वाचा- Sex Positions 2021: नववर्षाच्या सुरुवातीला जाणून घ्या लीप फ्रॉग, मॅजिक माउंटेन पासून या सेक्स पोजिशन्स
1. हस्तमैथुन करण्याआधी तुम्ही तुमचे हात स्वच्छ पाण्याने साबण वा हँडवॉश लावून स्वच्छ धुवून गरजेचे आहे. तसे न केल्यास तुमच्या हातावरील विषाणू गुप्तांगातून शरीरात जाण्याची शक्यता असते.
2. हस्तमैथुन करताना एखादा स्वच्छ नॅपकिन/टॉवेल जवळ बाळगा. कारण त्या दरम्यान गुप्तांगातून येणारे वीर्य वारंवार पुसावे लागते.
3. हस्तमैथुन थोडं इंटरेस्टिंग करण्यासाठी तुम्ही हाताऐवजी सेक्स टॉयचाही वापर करु शकता.
4. हस्तमैथुन करताना योनीमार्गात कोणतीही काचेची, प्लॅस्टिकची, धारदार, अस्वच्छ वस्तू वापरू नये. यामुळे योनीमार्गास इजा होऊ शकते.
5. महिन्यातून 15 ते 20 वेळा तुम्ही मास्टरबेशन करु शकता. पण 30 पेक्षा जास्त होऊ देऊ नका.
6. हस्तमैथुन करताना तुमच्या हाताच्या बोटांची नखे कापलेली असावीत. अन्यथा नखांमुळे तुमच्या गुप्तांगाला मोठी जखम होऊ शकते.
सध्याच्या काळात टेक्नोलॉजीमुळे खूप कमी वयातच मुला-मुलींमध्ये हस्तमैथुन करतानाचा प्रकार दिसून येतो. मात्र पालकांनी .यावेळी त्यांचे चांगले मित्र बनून त्यांना योग्य ते ज्ञान द्या. त्यांच्या कलेने घेण्याचा प्रयत्न करा.
(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.)