Gleeden (Photo Credits: IANS)

Extra-Marital Dating App Gleeden: सध्या सोशल मिडीयावर विवाहबाह्य संबंधांसाठी असलेल्या ग्लीडन (Gleeden) नावाच्या डेटिंग अॅपची चर्चा आहे. फ्रान्समध्ये 2009 मध्ये सुरु झालेले हे अॅप विवाहित व्यक्तींसाठी विवाहबाह्य संबंध शोधण्यासाठी व्यासपीठ प्रदान करते. आता भारतामध्येही हे अॅप लोकप्रिय ठरत असल्याचे दिसत आहे. ग्लीडनच्या वापरकर्त्यांच्या संख्येत 270% वाढ झाली आहे. एका अहवालानुसार, 2024 मध्ये या ॲप्लिकेशनचे भारतामध्ये सुमारे 3 दशलक्ष वापरकर्ते होते, त्यापैकी बहुतेक विवाहित होते. इतक्या मोठ्या प्रमाणावरील वापरकर्त्यांमुळे भारत हा ग्लीडनसाठी एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ बनला आहे. सर्वाधिक वापरकर्त्यांसह बेंगळुरू पहिल्या क्रमांकावर आहे.

ग्लीडनचा दावा आहे की ही जगातील पहिली एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग वेबसाइट आणि ॲप आहे. आता ग्लीडेनने अहवाल दिला की, 2024 मध्ये महिला वापरकर्त्यांची संख्या 128 टक्क्यांनी वाढली आहे. आता ग्लीडनच्या वापरकर्त्यांपैकी 58 टक्के महिला आहेत. यापैकी 40  टक्के लोक दररोज 45 मिनिटे ॲपवर घालवतात. अनेक वापरकर्ते 30-45 वर्षांच्या दरम्यान आहेत.

ग्लीडनच्या भारतीय वापरकर्त्यांच्या संख्येत 20 टक्क्यांसह बेंगळुरू आघाडीवर आहे. यानंतर मुंबईत 19 टक्के, कोलकात्यात 18 टक्के आणि दिल्लीत 15 टक्के वापरकर्ते आहेत. मेट्रो शहरांमध्ये सर्वाधिक वापरकर्ते आहेत. भोपाळ, वडोदरा आणि कोची सारख्या छोट्या शहरांमध्ये देखील वापरकर्ते वेगाने वाढत आहेत. कंपनीची अधिक शहरांमध्ये विस्तार करण्याची योजना आहे. पुढील वर्षापर्यंत भारतीय वापरकर्त्यांची संख्या 50 लाखांच्या पुढे जावी यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. (हेही वाचा: Sex Stimulation Pills: भारतामध्ये लैंगिक उत्तेजना आणि पुरुषी सामर्थ्य वाढवणाऱ्या औषधांची मागणी वाढली; 12 महिन्यांत Viagra, Cialis सारख्या गोळ्यांची 800 कोटींची विक्री)

ग्लीडनच्या वेबसाईटनुसार, महिला हे मोफत वापरू शकतात, मात्र पुरुषांना त्यासाठी 750 ते 9500 रुपये खर्च करावे लागतील. ग्लीडनच्या मते, हे ॲप खासकरून महिलांसाठी तयार करण्यात आले आहे. आकडेवारीनुसार, ग्लीडन ॲपवर भारतातील बहुतेक लोक उच्च वर्गातील आहेत. यामध्ये मुख्यतः अभियंता, उद्योजक, व्यवस्थापक, अधिकारी आणि डॉक्टर यांसारख्या व्यवसायातील लोकांचा समावेश आहे. महिलांबद्दल बोलायचे झाले तर ॲपच्या वापरकर्त्या मोठ्या संख्येने गृहिणी आहेत.