Sex Stimulation Pills: लैंगिक उत्तेजना (Sex Stimulation) आणि सामर्थ्य वाढवणाऱ्या औषधांची विक्री भारतात झपाट्याने वाढत आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्याच्या अहवालानुसार, इंडस्ट्री इनसाइडर्स म्हणतात की, लोक त्यांच्या सेक्सबाबत (Sex) असलेल्या संकोचांवर मात करत आहेत आणि त्यांचे लैंगिक जीवन सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळेच या गोळ्यांची मागणी वाढू लागली आहे. मार्केट रिसर्च फर्म फार्मरॅकच्या डेटावरून असे दिसून आले आहे की, व्हायग्रा आणि सियालिस ब्रँड अंतर्गत लैंगिक उत्तेजक उत्पादनांच्या विक्रीत वर्षानुवर्षे 17% वाढ झाली आहे.
डेटा दर्शवितो की व्हायग्रा ब्रँड सिल्डेनाफिलची विक्री सप्टेंबर 2023 ला संपलेल्या 12 महिन्यांत 456 कोटींवरून 15% जास्त, 525 कोटी रुपये झाली आहे. फार्मरॅकच्या मते, याच कालावधीत Tadalafil ब्रँडची विक्री 205 वरून 244 कोटी झाली, म्हणजेच त्यात 19% वाढ झाली. फार्मरॅक डेटा दर्शविते की, या वर्षी सप्टेंबरपर्यंत गेल्या 12 महिन्यांत लैंगिक उत्तेजना आणि शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांची विक्री 829 कोटी झाली आहे.
फार्मास्युटिकल कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, लैंगिक उत्तेजना वाढवणाऱ्या औषधांची मागणी वाढली आहे कारण आता लोक लैंगिक वर्तन आणि प्रयोगांबाबत अधिक खुल्या विचारांचे झाले आहेत. मागणी जास्त असल्याने कंपन्या नवीन उत्पादने लाँच करत आहेत. या मागण्यांमध्ये आयुर्वेदिक गोळ्यांचाही समावेश आहे. लैंगिक उत्तेजना वर्धित करणारी औषधे लैंगिक प्रतिक्रिया चक्राच्या चार टप्प्यांपैकी एकावर काम करतात, म्हणजे इच्छा, ताठरता, भावनोत्कटता आणि समाधान. (हेही वाचा: https://marathi.latestly.com/social-viral/y-chromosome-disappearance-humanity-future-573528.html)
मात्र ही औषधे विहित कालावधीसाठी वैद्यकीय देखरेखीखालीच सुरक्षित असतात. मात्र, त्यांचे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात. यामध्ये मळमळ, पोटदुखी, अतिसार, सूज, डोकेदुखी, जलद हृदयाचे ठोके आणि ऍलर्जीक प्रतिक्रियांचा समावेश असू शकतो. तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. याआधी डेलीमेलमधील एका अहवालात म्हटले होते की, व्हायग्रा आणि सियालिससारख्या औषधांचे सेवन केल्याने 200 लोकांचा मृत्यू झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये केवळ पुरुषच नाही तर महिलांचाही समावेश आहे.