शास्त्रज्ञांनी विकसित केले अँटीऑक्सिडंट गुणांनी परिपूर्ण पांढरे वांगे; जाऊन घ्या त्याचे गुणधर्म
पांढरी वांगी (संग्रहित संपादित प्रतिमा)

कृषी शास्त्रज्ञांनी वांग्याचे दोन प्रकार विकसित केले आहेत, ज्यात उच्च पोषक तसेच अँटिऑक्सिडेंट गुणधर्म (Antioxidant Properties) आहेत. पारंपारिक वाग्यांपेक्षा यांचे उत्पादनही जास्त होते. भारतीय कृषी संशोधन परिषद आणि भारतीय कृषी संशोधन संस्थेने अलीकडेच पूसा पांढरी वांगी 1 (Pusa White Brinjal 1) आणि पूसा हिरवी वांगी 1 प्रजाती विकसित केले आहेत, जी अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत.

पारंपारिक वाग्यांपेक्षा ही वांगी जलद वाढतात आणि त्यांचे समृद्ध उत्पादनही घेता येते. बायोकेमिकल्सच्या दुष्परिणामांपासून अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराचे रक्षण करतात. आपल्या शरीरात लाल रक्तपेशींची संख्या वाढवून ते रोग प्रतिकारशक्ती मजबूत करतात. अँटीऑक्सिडंट्स त्वचेला सूर्यापासून आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचावासाठी जास्त प्रमाणात ऑक्सिजन शोषण्यास मदत करतात. त्यामुळे ही वांगी शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरतील असा विश्वास व्यक्त केला गेला आहे.

ऑक्सीकरण प्रक्रिया ही आपल्या शरीरात होणार्‍या बर्‍याच क्रियांमध्ये चालू असते. या प्रक्रियेमध्ये आपल्या शरीरात मुक्त रॅडिकल्स वाढू लागतात. त्याच वेळी, ते पेशींच्या निर्मितीमध्ये आणि शरीरातील पेशींची संख्या वाढविण्यात मदत करतात, परंतु पेशी निर्मिती आणि वाढीसाठी केवळ काही जीवाणू उपयुक्त आहेत. जर त्यांची संख्या वाढत गेली तर ते आपल्या शरीराच्या पेशी नष्ट करू लागतात, ज्यामुळे आपली कार्यक्षमता कमी होऊ लागते आणि बरेच आजार आपल्या शरीरात हळूहळू त्यांची जागा घेतात. या अतिरिक्त बॅक्टेरियांचा नाश करून अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराचा रोग मुक्त आणि उत्साही ठेवण्यास मदत करतात. (हेही वाचा: प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर जळगावात बनवणार 3200 किलो वांग्यांचे भरीत, Guinness World Records मध्ये होणार नोंद!)

पूसा पांढरे वांगे 1 हे पांढऱ्या रंगाचे, अंड्याच्या आकाराचे वांगे आहे. उत्तर भारतातील जमिनीत खरीप हंगामात त्यांची लागवड करता येईल. ही एक जलद वाढणारी वांग्याची प्रजाती आहे, जी लागवडीच्या 40 ते 55 दिवसांच्या आत फुलते. त्याची झाडे मध्यम उंचीची असतात. याच्या वांग्याचे वजन 50 ते 60 ग्रॅम आहे. पूसा पांढर्‍या वांग्याचे उत्पादन एक हेक्टरमध्ये 35 टन पर्यंत होते. एक हेक्टरमध्ये वांग्याची लागवड करण्यासाठी, 250 ग्रॅम बियाणे आवश्यक आहे, जे रोपवाटिकेत लावले जाते.