
5 फूटाचा पराठा , 9 फूट लांबीचा कबाब , सलग 53 तास कुकींग, 3000 किलोची खिचडी, आणि आता 2500 किलोहून अधिक वांगी वापरुन प्रसिद्ध शेफ़ विष्णू मनोहर ( Vishnu Manohar) आज जळगावामध्ये (Jalgaon) वांग्याचं भरीत (Bharit) बनवणार आहेत. यासाठी बामणोद या जळगावपासून 28-30 किमी दूर असलेल्या गावातून खास वांगी निवडून आणण्यात आली आहेत. जळगावात सागर पार्क मैदानावर हा विश्वविक्रम रचला जाणार आहे.
खानदेशी खाद्यसंस्कृतीमध्ये वांग्याचं भरीत हे विशिष्ट पद्धतीने भाजून बनवलं जातं. त्यासाठी 3200 किलो वांगी आणि 120 किलो तेल आणि इतर पदार्थांचा समावेश केला जाणार आहे. 4000 किलो भार पेलणारी विशिष्ट चुल यासाठी बनवण्यात आली आहे. तर भरीत बनविण्यासाठी लागणारा डाव 11 फुट लांब आहे.
विष्णू मनोहर यांच्यासोबत या उपक्रमासाठी 60 महिला, 40 पुरूष, 20 सुपरवायझर, 2 मुख्यनिरीक्षक असतील. वांग्याचं भरीत बनवण्याचा हा उपक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दाखल होणार आहे. मराठी प्रतिष्ठान या उपक्रमाच्या आयोजकांच्या भूमिकेत आहेत.