Dhulivandan 2019 Date: होळी दहनानंतरचा दुसरा दिवस म्हणजे धूलिवंदन (Dhulivandan). यंदा 21 मार्च 2019 दिवशी देशभर धुलिवंदनाचा सण साजरा केला जाणार आहे. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून पुढील चार दिवस धुळवडीचा सण साजरा केला जातो. तर फाल्गुन कृष्ण पंचमी दिवशी रंगपंचमी (Rang Panchami) साजरी करण्याची प्रथा आहे. मात्र मुंबई,पुणे सारख्या मेट्रो पॉलिटन शहरात धुलिवंदनाचा दिवस हा रंगपंचमी म्हणून साजरा केला जातो. मात्र ग्रामीण भागात अजूनही पारंपारिक पद्धतीने होळीचा सण पाच दिवस साजरा करण्याची पद्धत आहे. होळी म्हणजे होलिदानादिवशी होळी पेटवून तिची पूजा करत पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच राखेमध्ये पाणी किंवा तेल मिसळून अंगाला लावण्याची पद्धत आहे. Holi 2019: होलिका दहनानंतर आठवडाभरात येणारे व्रत, सण-समारंभ; पहा संपूर्ण यादी
धूलिवंदन महत्त्व
फाल्गुन हा शालिवाहन शक महिन्यातील शेवटचा महिना आहे. त्यामुळे होळी हा हिंदू दिनदर्शिकेनुसार येणाऱ्या महिन्यातील शेवटचा सण असतो. होळी पेटवून दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी जमिनीला, मातीला नमस्कार करण्याची प्रथा आहे. प्रत्येक प्राणी मात्राचा देह हा पंचमहाभूतांपासून बनलेला असतो. पृथ्वी, आप, त्वज, वायू, आकाश असा या पंचमहाभूतांचा क्रम आहे. पृथ्वी पासून सुरुवात आणि आकाशापर्यंत शेवट असे पंचक असणाऱ्या या तत्वांना आपल्या सणांच्या मधून आदर व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे धूलिवंदन. यादिवशी पृथ्वीला वंदन केले जाते. त्यानंतर १५ दिवसांनी नववर्षाची म्हणजे पाडव्याच्या दिवशी आकाशाला भिडणारी गुढी उभारण्याची पद्धत आहे. WhatsApp, Hike, Helo Happy Holi Stickers: धूलिवंदनाच्या शुभेच्छा देण्यासाठी कलरफूल स्टिकर्स
होळीदिवशी मनातील आणि सृष्टीतील अविनाशी गोष्टी जाळून धुलिवंदनापासून पृथीला नमस्कार करून नवीन दिवसाची सुरुवात करा असा संकेत दिला आहे. त्यामुळे रंगांची उधळण करून हा दिवस साजरा करण्याची प्रथा आहे. पूर्वीच्या काळी धुलीवंदनाच्या दिवशी होळीचं जळतं लाकूड, अग्नी घरीही आणला जात असे त्यावर पाणी तापवून आंघोळ करण्याची प्रथा आहे.
बदलत्या जीवनशैलीनुसार आज सणाचं स्वरूपही बदलत जात आहे. आज योगायोगाने वन्य दिन देखील आहे. त्यामुळे धुळवड / धूलिवंदन साजरं करताना आज पर्यावरणाला हानी होणार नाही याची काळजी घ्या. किमान एक झाड लावण्याचा ते जपण्याचा प्रयत्न करा.