Dhulivandan 2019: होळी दहनानंतर आज (२१ मार्च) दिवशी महाराष्ट्रासह देशभरात धुलीवंदन (Dhulivandan) सण साजरा केला जात आहे. काही ठिकाणी धुलीवंदन / धूळवड (Dhulvad) )ही होळीच्या राखेपासून खेळली जाते तर काही ठिकाणी हा उत्साह रंगांनी आणि पाण्याने द्विगुणित केला जातो. वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देणारा हा सण आनंदाचा आहे. मग तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत, प्रियजनांसोबत तो शेअर करण्याला काय हरकत आहे? व्हॉट्सअॅप (WhatsApp), हॅलो (Helo), हाईक (Hike) यासारखी मेसेजिंग अॅप धुळवडीचा आनंद शेअर करण्यासाठी खास स्टिकर्स घेऊन आले आहेत. बॉलिवूडच्या 'कब है होली?' फेमस डायलॉग्स पासून 'रंग बरसे' गाण्यांचे बोल यांनी ही स्टिकर्स बनवली आहेत. Happy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं!
WhatsApp Holi Stickers
व्हॉट्सअॅपवर मागील काही महिन्यांपासून अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हीवर व्हॉट्सअॅप स्टिकर्स उपलब्ध आहेत. स्टिकर्स मध्ये जाऊन + साईन वर क्लिक करून तुम्ही गुगल प्ले स्टोअर्स मधून खास हॅप्पी होळी स्टिकर्स डाऊनलोड करू शकता. स्वतःची कस्टमाईज्ड स्टिकर्स बनवून शेअर करण्याची सोय देखील देण्यात आली आहे. WhatsApp Stickers Update : '8' सोप्या स्टेप्समध्ये कोणताही फोटो बनू शकेल आता Sticker
Hike Holi Stickers
व्हॉट्सअॅप प्रमाणे तरुणाईमध्ये हाईक देखील प्रचंड लोकप्रिय आहे. होळीनिमित्त हाईक कडूनही नवनवीन स्टिकर्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. App मध्येच ही स्टिकर्स डाऊनलोड साठी उपलब्ध करण्यात आली आहेत.
Helo Holi Stickers
भारतीय भाषांमधील सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म हळूहळू लोकप्रिय होत आहे. यामध्येही हॅप्पी होळी स्टिकर्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ‘Holi by Helo’ स्टिकर्स सोबत, काही फोटोज आणि स्पेशल इफेक्ट्स फ्रेम डिझाइन्स देण्यात आली आहेत. यामुळे काही लोकप्रिय कलाकारांच्या फोटोसोबत सेल्फी क्लिक करण्याची इच्छा तुम्हाला पूर्ण करता येईल.
होळीचा सण हा चैतन्याचा आणि आनंदाचा आहे. त्यामुळे यादिवशी तुम्ही ज्याव्यक्तीसोबत होळी, धुळवड खेळत आहेत त्याचा आनंद जपायला विसरू नका. नैसर्गिक रंगांनीच होळी खेळा म्हणजे त्वचेचं आणि पर्यावरणाची हानी देखील रोखण्यास मदत होईल.