होळीच्या अगदी दुसऱ्याच दिवशी आपल्याकडे रंग, पिचकऱ्या, फुग्यांची रेलचेल असते. सर्वच जण रंगात अगदी न्हाऊन निघतात. त्यामुळे धूळवड, रंगपंचमी हे दोन्ही दिवस एकाच दिवशी साजरे केले जातात. पण धूळवड आणि रंगपंचमी हे दोन दिवस वेगळे असून फाल्गुन कृष्ण पंचमीला 'रंगपंचमी' हा सण साजरा केला जातो. धुलिवंदनापासून सुरु होणाऱ्या वसंत्सोवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. म्हणून त्यास 'रंगपंचमी' म्हणतात. पण मुंबईसारख्या शहरांमध्ये दुसऱ्या दिवशीच सुट्टी असल्याने धुडवळ आणि रंगपंचमी एकाच दिवशी साजरे केले जातात. होळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, Quotes, SMS, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं!
तर रंगीबेरंगी शुभेच्छा देऊन रंगपंचमीची आठवण आपल्या नातेवाईक, मित्रमंडळींना करुन द्या. रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, Quotes, SMS, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं....
रंगात रंगुनी जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहुदे रंग,
सौख्याचे–अक्षय तरंग!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो
सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्या-वेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा.
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
क्षणभर बाजुला सारु
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग, गुलाल उधळु
रंगवुया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण..
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंगाच्या दुनियेत लहान-थोर दंगली
रंगबेरंगी रंगात चिंब-चिंब न्हाली!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
GIFs
रंगाचा हा सण साजरा करताना यंदा आपण थोडा हटके विचार करुया आणि नैसर्गिक रंगांची उधळण करुया. त्यामुळे कोणालाही हानी पोहचणार नाही. तसंच पाणी बचतीसाठी कोरडी होळी खेळणे अधिक फायदेशीर ठरेल. तर यंदा तुम्हीही आपल्या जवळच्या, आपुलकीच्या माणसांसोबत रंगांच्या या सणाचा आनंद घ्या. तुम्हाला सर्वांना रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!