Happy Holi 2019: होळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश,  SMS, Quotes, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं!
Happy Holi 2019 (Photo Credits: File Photo)

Holi 2019: हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरता नाही. आपले विविध सण जितके आनंदी, उत्साही तितकेच अर्थपूर्णही. असाच एक रंगाचा सण म्हणजे 'होळी.' शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणार सण म्हणजे 'होळी.' देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगळी. पण तितकीच खास आणि आकर्षण.

दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, असा या सणामागील उद्देश. होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड या सगळ्याचे आकर्षण तर असतेच. पण आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना होळी सणांच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश, SMS, Quotes, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं..... होळी, धूळवड, रंगपंचमी 2019 आणि शिमगा यंदा नेमका कधी आहे?

रंग नात्यांचा, रंग बंधाचा,

रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,

रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…

होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

01 (1)

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी

रंगामध्ये रंगून जाण्याआधी,

होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,

पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

03 (1)

होळी संगे केरकचरा जाळू

झाडे वाचवू अन् कचरा हटवू

निसर्गरक्षणाचे महत्त्व पटवू

होळीच्या हरित शुभेच्छा!

04 (1)

रंगबेरंगी रंगाचा सण हा आला

होळी पेटता उठल्या ज्वाला

दृष्टवृत्तीचा अंत हा झाला

सण आनंदे साजरा केला.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

2019-03-13

न जाणता जात नि भाषा

उधळूया रंग, चढू दे प्रेमाची नशा

मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे

भिजुनी फुलवूया प्रेम रंगाचे मळे

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

05 (1)

होळीसाठी खास GIFs

via GIPHY

via GIPHY

via GIPHY

आपआपल्या कामात व्यस्त असलेल्या सर्वांना एकत्र आणण्याचे काम सण करतात. सण हे प्रेम, एकता, आपुलकी याचे प्रतीक असतात. परस्परातील राग-रुसवा दूर सारुन पुन्हा एकदा नव्याने नाते सुरु करण्याची ती एक संधी असते. तुम्हीही आपापसातील मतभेद, गैरसमज दूर सारुन होळीनिमित्त नव्याने एकत्र या आणि नाते फुलवा. तुम्हाला सर्वांना होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!