WhatsApp Stickers Update : '8'  सोप्या स्टेप्समध्ये कोणताही फोटो बनू शकेल आता Sticker
WhatsApp Stickers Android (Photo Credits: Google Play)

दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या व्हॉट्सअॅपने काही दिवसापूर्वीच व्हॉट्स ऍप स्टिकर्सचं फिचर लॉन्च केलं आहे.व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनवर उपलब्ध असलेलं हे फिचर अल्पावधीतच लोकप्रिय झालं आहे. अनेकांना हे फिचर पाहता येत नसल्याने त्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. कोणी सेटिंग्स मध्ये बदल करून तर कोणी प्ले स्टोअर वरून इतर ऍप च्या मदतीने व्हॉट्स अप स्टिकर्सची हौस पूर्ण करत आहे. पण आता व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेट नुसार कोणताही फोटो व्हॉट्सअॅप स्टिकर मध्ये बदलता येणार आहे. त्यामुळे दिवाळी नंतरही व्हॉट्सअॅप स्टिकर्स ची क्रेझ कायम राहणार आहे.

या दोन्ही सिस्टीमवर व्हॉट्सअॅपने स्टिकर्सचा पर्याय दिला आहे. आता काही थर्ड पार्टी अॅपच्या मदतीने तुम्ही कोणत्याही फोटोचा स्टिकर बनवू शकणार आहात. sticker maker for WhatsApp हे प्ले स्टोअर वर अशाप्रकारे स्टिकर बनवण्यासाठी लोकप्रिय ऍप आहे. आता चॅट करणे होईल आणखी मजेशीर; Whatsapp मध्ये नवे स्टिकर्स

कसा बनवाल स्टिकर ?

१. अँड्रोईड फोनमध्ये background eraser application आणि sticker maker डाउनलोड करणं आवश्यक आहे.

२. अँड्रोईड फोनमध्ये दोन्ही ऍप डाऊन लोड झाल्यानंतर background eraser applicationसुरु करा.

३. on-screen eraser button च्या मदतीने फोटोच्या मागे असणारी बॅग्राऊंड तुम्ही खोडू शकता. हा फोटो तुम्हांला PNG format मध्ये सेव्ह करणं आवश्यक आहे.

४. sticker maker for WhatsApp या अप्लिकेशन मध्येही बॅग्राऊंड खोडण्याची सोया देण्यात आली आहे.

५. sticker maker मध्ये new stickerpack या पर्यायावर क्लिक करा.

६. stickerpack name आणि sticker author columns ही माहिती भरल्यानंतर create option वर क्लिक करा.

७. tray icon म्हणून तुम्ही PNG format मध्ये सेव्ह केलेला फोटो निवडा.

८. एक पॅक तयार करण्यासाठी तुम्हाला किमान तीन स्टिकर्सची गरज आहे. त्यानंतर ‘Add to WhatsApp’ वर क्लिक करा. व्हॉट्सअॅप स्टिकर्सवर ही नवी तयार केलेली स्टिकर्सही आपोआप दिसतील.

व्हॉट्सअॅपवर काही ठराविक स्टिकर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे आता तुम्हाला हवं तेव्हा हव्या त्या फोटोचा स्टिकर आता व्हॉट्सअॅप ग्रुप किंवा चॅटमध्ये तुम्ही पाठवू शकणार आहात.