Whatsapp वर चॅट करणे अजून मजेशीर व्हावे, वापरकर्त्यांना एक नवीन अनुभव मिळावा म्हणून पुन्हा एकदा whatsapp आपल्या नव्या फिचरसह बाजारात दाखल झाले आहे. यावेळी whatsapp ने स्टिकर्सचा फंडा वापरला आहे. याधीही इमोजी, स्टेटस, स्टोरीज अशा माध्यमातून whatsapp ने लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता अशा प्रकारची स्टिकर्स फेसबुकवर उपलब्ध आहेत, आणि ती लोकांना फारच आवडली आहेत, त्यामुळे whatsapp ने देखील आपल्या नव्या व्हर्जनमध्ये ही स्टिकर्स उपलब्ध करून दिली आहेत.
ही स्टिकर्स आयओएस आणि अॅन्ड्रॉईड दोन्ही युझर्ससाठी उपलब्ध असतील. एकदा डाऊनलोड केल्यानंतर ती तुम्हाला ऑफलाईनही वापरता येतील. यासाठी तुम्हाला किबोर्डमध्ये एक स्टिकर्सचा ऑप्शन देण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्ही हवी स्टिकर्स वापरू शकता, तुम्हाला अजून स्टिकर्स हवी असल्यास ती तुम्ही प्लेस्टोअरमधून डाउनलोड करू शकता.
ही स्टिकर्स अॅन्ड्रॉईड बीटा व्हर्जन 2.18.329 वर आणि आयफोन व्हर्जन 2.18.100 वर उपलब्ध असतील, असे whatsapp ने एका ब्लॉग पोस्टवर म्हटले आहे. whatsapp च्या या नव्या स्टिकर्स फिचरमध्ये तुम्हाला 12 स्टिकर्सचा एक पॅक मिळेल. whatsapp अजून स्टिकर्स उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे.