होळी, धुळवडीच्या सेलिब्रेशननंतर पुढील आठवडाभर विविध सण, उत्सव आहेत. आपल्याकडे मात्र धुळवड आणि रंगपंचमी एकाच दिवशी साजरी केली जाते. पण धूळवड आणि रंगपंचमी हे दोन दिवस वेगळे असून फाल्गुन कृष्ण पंचमीला 'रंगपंचमी' हा सण साजरा केला जातो. धुलिवंदनापासून सुरु होणाऱ्या वसंत्सोवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. म्हणून त्यास 'रंगपंचमी' म्हणतात. पण मुंबईसारख्या शहरांमध्ये दुसऱ्या दिवशीच सुट्टी असल्याने धुडवळ आणि रंगपंचमी एकाच दिवशी साजरे केले जातात. रंगपंचमी बरोबरच आठवड्यात विविध सण, समारंभ आहेत. होळी निमित्त 'गेट वे ऑफ इंडिया'वर रंगांची उधळण; पहा लाईट शो चे खास Photos
तर जाणून घेऊया होळी, धुळवडीनंतर पुढील आठवड्यात येणारे विविध व्रत, सण समारंभ...
# 21 मार्च (गुरुवार)- धुलिवंदन, स्नान दान पौर्णिमा- चैत्र कृष्ण प्रारंभ- वसंतोत्सव- रतिकाम महोत्सव (नक्की वाचा: Dhulivandan 2019: धूलिवंदन सण केवळ रंगांनी नव्हे तर 'असा' साजरा केला जातो, पहा धुलिवंदनाचं महत्त्व)
# 22 मार्च (शुक्रवार)- राष्ट्रीय चैत्र मास प्रारंभ- शक संवत् 1941 प्रारंभ - संत तुकाराम जयंती
# 24 मार्च (रविवार)- संकष्टी श्री गणेश चतुर्थी
# 25 मार्च (सोमवार)- रंग पंचमी
आपली संस्कृती विविध सणांनी सजलेली आहे. त्यामुळे संस्कृतीत व्रत वैकल्य, सण समारंभांची रेलचेल असते.