The Gateway of India on Holi 2019 eve | (Photo Credits: Twitter)

काल (20 मार्च) होळी आणि आज (21 मार्च) रंगपंचमी, धुळवडचा आनंद, उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. या रंगीत सणाचा आनंद प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने साजरा करत असताना मुंबापुरीही विविध रंगांत न्हाऊन निघाली आहे. होलिका दहनाच्या काही तासांपूर्वी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया विविध रंगांनी नटलेला दिसत आहे. 'गेट वे ऑफ इंडिया'त (Gate Way Of India) बुधवारी (20 मार्च) संध्याकाळपासून 'लाईट शो' (Light Show) पाहायला मिळत आहे. Happy Holi 2019 Google Doodle: रंगीबेरंगी डुडलसह गुगलचे होळी सेलिब्रेशन

मुंबईची शान असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ची बांधणी 20 व्या शतकात करण्यात आली आहे. या आर्क स्मारकाची बांधणी 1911 मध्ये अपोलो बंदर येथे किंग जॉर्ज व्ही आणि क्वीन मेरी यांच्या स्मृतीप्रत्यर्थ करण्यात आली. रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं!

पहा लाईट शो चे खास फोटोज:

A-Gateway-
गेट वे ऑफ इंडियावरील होळीची उधळण | (Photo Credits: Twitter)

हिंदू परंपरेत सणांची काही कमतरता नाही. होळी हा त्यापैकी एक मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा सण. होळी देशातील विविध भागात साजरी करण्याची पद्धत, परंपरा वेगळी असली तरी त्यामागील उद्देश-भावना एकच. पण प्रत्येक सणात मुंबईचा असा एक खास आकर्षक फ्लेव्हर असतो. होळीनिमित्त तो पुन्हा एकदा पाहायला मिळाला.