Happy Holi 2019 Google Doodle: रंगीबेरंगी डुडलसह गुगलचे होळी सेलिब्रेशन
Holi 2019 Google Doodle (Photo Credit: Google)

होळी नंतर आज देशभरात धुळवड, रंगपंचमी सणांचा उत्साह पाहायला मिळत आहे. रंगपंचमी, धुळवड निमित्त आपण विविध रंगांची उधळण करतो. याच रंगीत सणाचा आनंद गुगलने रंगबेरंगी डुडल साकारत जगभर पसरवला आहे.

रंगांचा हा सण म्हणजे हिवाळा संपून उन्हाळा सुरु असल्याचा संकेत. हा सण भारत आणि नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. होलिका दहनानंतर रंगांची उधळण करण्यास सुरुवात होते. मग रंग, पिचकाऱ्या, फुगे यांची रेलचेल असते. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वच या रंगात न्हाऊन निघतात. या रंगीत सणाचा आनंद साजरा करण्यासाठी अनेकजण आपल्यातील वाद, गैरसमज, मतभेद दूर सारुन एकत्र येतात. रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं!

गुगलच्या या डुडलमध्येही आपल्याला एक महिला दुसऱ्या महिलेच्या अंगावर रंग उडवताना दिसत आहे. तर लहान मुलगा पिचकारीने रंग उडवत आहे. एक मुलगी काहीतरी खाताना दिसत आहे आणि एक व्यक्ती खिडकीतून होळी खेळणाऱ्यांकडे पाहत आहे. होळीच्या सणाचा आनंद या डुडलमध्ये एकवटला आहे. त्याचबरोबर हे डुडल विविध रंगांनी नटलेले असून होळीचे सेलिब्रेशन यात अगदी अचूक दाखवण्यात आले आहे.

खास दिवस, सण समारंभ आणि दिग्गजांच्या जयंती, स्मृतीदिनानिमित्त डुडल साकारण्याची परंपरा गुगलने आजच्या दिवशीही कायम ठेवली आहे.