Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Suicide News:  उत्तर प्रदेशमध्ये एका 14 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकाने तीच्या दलित जातीवर आणि गरिबीवर टीका केल्यामुळे तीनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.सध्या पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. मुझफ्फरनगरमधील एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना त्यांच्या एका वर्गमित्राला थप्पड मारण्यास सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशा बानो असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव होते ही बाराबंकी जिल्ह्यातील अझीमुद्दीन अश्रफ इस्लामिया इंटर कॉलेजची विद्यार्थिनी होती. तिच्या आईने सांगितले की, माझ्या पतीचा 2018 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. मोठ्या कष्टाने मी आयशा आणि तिच्या धाकट्या बहिणीला २०२२ मध्ये शाळेत प्रवेश मिळवून दिला.

27 मे रोजी आयशाने शाळेची फी म्हणून 1100 रुपये भरल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. मात्र वास्फी खातून (शिक्षिका) यांनी त्यांना 1100 रुपयांपेक्षा कमी रकमेची पावती दिली. यानंतर आयशाने शिक्षिकेला विचारले की, जेव्हा तिने फीची पूर्ण रक्कम भरली आहे, तेव्हा कमी पैसे भरल्याची पावती का दिली, या संदर्भात शिक्षिकेला विचारणी केली, तेव्हा शिक्षिकाने तीला उलट उत्तर दिलं. गरीब आणि दलित जातीची असूनही असं व्यवहार करत आहे जस की काय उच्च घरातील व्यक्ती आहे. असा जबाब शिक्षिकाने दिला.  या गोष्टी नंतर आणखी काही शिक्षकांनी तीला असं बोलून मानसिक छळ केल्याचे समोर आले आहे.

या गोष्टीचा राग धरत, आय़शाने आत्महत्या केली. राहत्या घरात तीने गळफास घेवून आत्महत्या केली.या घटनेनंतर तीच्या घराची तपासणी केल्यावर पोलीसांना चिठ्ठी सापडली. चिठ्ठीत तीनं मला काही शिक्षकांकडून मानसिक छळ होत असल्याने टोकाचे पाऊस उचलेले आहे. पोलीसानी आयशाच्या आईच्या सांगण्यावरून शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या कऱण्यास प्रवृत्त करणाऱ्या शिक्षकावर तक्रार दाखल झाली आहे.