
मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर बेतलेला 'छावा' (Chhaava) हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. हा हिंदी ऐतिहासिक चित्रपट शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या मराठी कादंबरीवर आधारित आहे. सध्या महाराष्ट्रात या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. 'छावा' चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर चांगली कमाई केली असून, 2025 मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे, तसेच 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपटही ठरला आहे. आता आमदार संग्राम जगताप यांनी महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये छावा चित्रपटाचे मोफत प्रदर्शन करण्याची घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींसाठी 7 दिवस हा चित्रपट मोफत दाखवला जाणार आहे.
सोमवारपासून महिलांसाठी छावा चित्रपटाचे मोफत स्क्रीनिंग सुरु झाले असून, ते रविवारपर्यंत चालणार आहे. एका महिलेला एक तिकीट देण्याचे नियोजन आहे. हा चित्रपट पाहून प्रत्येक महिलेच्या मनात देशप्रेमाची, धर्मप्रेमाची भावना निर्माण होईल, असा विश्वास संग्राम जगताप यांनी व्यक्त केला. छत्रपती शंभाजी महाराजांचे धैर्य, शौर्य, ज्ञान आणि कामगिरी लोकांपर्यंत हे या उपक्रमाचा उद्देश आहे. यासह आमदारांनी छावा हा चित्रपट करमुक्त करण्याची विनंती केली असून, सर्व महाराष्ट्रीय नागरिकांना तो पाहण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.
दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उटेकर यांनी केले आहे, तर मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली दिनेश विजान यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात विक्की कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर रश्मिका मंदाना येसूबाई आणि अक्षय खन्ना औरंगजेब यांच्या भूमिकेत आहे. चित्रपटाच्या निर्मितीची तयारी एप्रिल 2023 मध्ये सुरू झाली, आणि मुख्य चित्रीकरण ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू होऊन मे 2024 मध्ये पूर्ण झाले. (हेही वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: शिवजयंतीनिमित्त 'छावा' स्टार विकी कौशलने रायगड किल्ल्याला दिली भेट, येथे पाहा फोटो)
Free Chhaava Screening For 'Ladki Bahins'-
चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन ए. आर. रहमान यांनी केले आहे, तर गीतलेखन इर्शाद कामिल आणि क्षितिज पटवर्धन यांनी केले आहे. 'छावा' चित्रपटाची कथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतरची आहे. छावाने पाचव्या दिवशी 25.75 कोटी कमावले. त्यामुळे चित्रपटाने आता एकूण 171.28 कोटी कमावले आहेत. परंतु ही कमाई मागील कमाईपेक्षा कमी आहे. चित्रपटाने चौथ्या दिवशी 24 कोटींची कमाई केली होती.