
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti:अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याने 'छावा' ( Chaava) या चित्रपटात साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, आज शिवजयंती आहे. शिवजयंती उत्सव वेगवेगळ्या भागात साजरा केला जातो. याशिवाय, रायगड ( Raigad) येथेही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शिवभक्तांसह अनेक मान्यवर येथे शिवजयंतीमध्ये सहभागी होतात. या खास प्रसंगी रायगडावर छ. शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती साजरी करण्यासाठी अनेक लोक किल्ल्याला भेट देतात. या निमित्त किल्ल्याला सुंदर पद्धतीने सजवले जाते. दरम्यान, अभिनेता विकी कौशल याने आज रायगड किल्ल्याला भेट देऊन महाराजांना आदरांजली वाहिली. छावा हा चित्रपट शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे.
येथे पाहा, अभिनेता विकी कौशलचा रायगड येथील फोटो
View this post on Instagram
19 फेब्रुवारी रोजी देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्ताने शिवभक्त विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या जातात आणि तरुण पिढीला शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे स्मरण करून त्यांचे जतन करण्यास प्रेरित केले जाते. विकी कौशलने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त रायगड किल्ल्याला भेट देणार असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होते.