Pune Vanraj Andekar murder: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात एका टोळीने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करून आणि गोळी झाडून त्यांची हत्या केली. पळून जाण्यापूर्वी हल्लेखोरांनी घटनास्थळी पाच ते सहा गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले. (हेही वाचा- खराडी परिसरात महिलेच्या हत्येचे प्रकरण; मृतदेह मुठा नदीत टाकणाऱ्या जोडप्याला अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी आंदेकर यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, तातडीने गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आंदेकर यांची नाना पेठेत मोठा प्रभाव असल्याचे वैयक्तिक वैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या करण्यात आली असा प्राथमिक अहवालातून समोर आले. वनराज हे गुंड बंडू आंदेकर यांचा मुलगा होता.
वनराज आंदेकर यांची हत्या
Pune: Former Corporator Killed After Being Shot & Stabbing In Nana Peth#Pune #VandrajAndekar #NCP #Shotdead #Shooting #Firing #Police #NanaPeth #Murder #Stabbing pic.twitter.com/jkTubFaMP2
— Donjuan (@santryal) September 1, 2024
Pune gangwar .... Corporator Vanraj Andekar of @AjitPawarSpeaks NCP shot at in Nana Peth.
— Himalayan Wonders (@HimalayanWow) September 1, 2024
बंडू आंदेकर यांचा जावई गणेश कोमकर हे वनराज यांच्या हल्लेमागील जबाबदार असल्याची माहिती आहे. गोळीबारच्या घटनेमागे गॅंगस्टर सूरज ठोंबरे याचाही हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या गोळीबारच्या घटनेमुळे परिसरात चिंता पसरली आहे. पोलिसांनी प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी परिसरातील लाईट घालवली होती. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. आंदेकर घटनास्थळी एकटे होते त्यामुळे आरोपींनी वेळ आणि संधी साधून त्यांच्यावर हल्ला केला.