Guillain Barre Syndrome

Guillain Barre Syndrome: पुण्यात (जीबीएस) चा धोका वाढत आहे.  महाराष्ट्रातही गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराने पाय पसरले आहे. सोमवारी गुलियन-बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झाल्याने 37 वर्षीय तरुणाच्या मृत्यू झाला असून जीबीएसमुळे मृतांची संख्या 7 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 192 संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी 167 रुग्णांची पुष्टी झाली आहे. गुलियन-बॅरे सिंड्रोममध्ये शरीराच्या रोगप्रतिकारकवर हल्ला करते. यामुळे अशक्तपणा, सुन्नपणा किंवा अर्धांगवायू होऊ शकतो. हात आणि पायात अशक्तपणा आणि मुंग्या येणे ही सहसा सुरवातीची लक्षणे असतात. या संवेदना पुढे पसरू शकता. त्याच्या सर्वात गंभीर स्वरूपात, गुलियन-बॅरे सिंड्रोम ही एक अशी आवस्था ज्यात रुग्ण स्वतः चालू शकत नाही. तो अंथरुणावर खिळतो. या आजारात बहुतेक लोकांना रुग्णालयात उपचारांची आवश्यकता असते.

गुलियन-बॅरे सिंड्रोम म्हणजे काय?

जीबीएस हा एक दुर्मिळ परंतु गंभीर न्यूरोलॉजिकल रोग आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूंवर हल्ला करते. यामुळे शरीरात अशक्तपणा, सुन्नपणा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. हा आजार रोगप्रतिकारक शक्तीतील बिघाडामुळे होतो. बर्याच प्रकरणांमध्ये, जीबीएसची स्थिती व्हायरल किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गानंतर देखील होऊ शकते. गुलियन-बॅरे सिंड्रोमसाठी कोणताही ठोस उपचार नाही. अनेक उपचार पर्याय लक्षणे कमी करू शकतात आणि जलद पुनर्प्राप्तीस मदत करू शकतात. बहुतेक लोक गुलियन-बॅरे सिंड्रोमपासून पूर्णपणे बरे होतात, परंतु या आजाराची लागण झाल्यानंतर एखाद्या रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. बरे होण्यास कित्येक वर्षे लागू शकतात, परंतु लक्षणे प्रथम दिसल्यानंतर  सहा महिन्यांनी बहुतेक लोक पुन्हा चालण्यास सुरुवात करतात. काही लोकांमध्ये अशक्तपणा, सुन्नपणा किंवा थकवा यासारखे दीर्घकाळ परिणाम जाणवू शकता.

पुण्यातील जीबीएसची स्थिती

पुण्यातील 167 रुग्णांपैकी 91 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 48 रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर जीवन-मरणाशी झुंज देत आहेत. आतापर्यंत 7 मृत्यू झाले आहेत, तर इतर 6 संशयास्पद मृत्यूंचा तपास सुरू आहे.

गुलियन-बॅरे सिंड्रोमची प्रकरणे पुणे महानगरपालिकेतील 39, पीएमसी क्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये 91, पिंपरी चिंचवड महापालिकेत 29, पुणे ग्रामीणमध्ये 25 आणि इतर जिल्ह्यांतील 8 अशा विविध भागांतून नोंदवण्यात आली आहेत. राज्य आरोग्य प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीत 55 पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. हे नमुने GBS बाधित भागातून घेतले गेले, विशेषत: नांदेडगाव, जेथे सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

संरक्षणासाठी काय करावे?

स्वच्छ पाणी प्या आणि उकळल्यानंतरच वापरा. हात धुण्याची आणि स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. अशक्तपणा किंवा असामान्य लक्षणे दिसल्यास, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करा. जीबीएसची वाढती प्रकरणे पाहता सावध राहण्याची गरज आहे. जर कोणाला सौम्य लक्षणे दिसली तर ताबडतोब वैद्यकीय तपासणी करा.