
Wayanad Shocker: अंबलावायल येथील एका जिममध्ये व्यायाम करताना एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृताचे नाव सलमान असे आहे, तो कुप्पक्कोली येथील रहिवासी आहे. सोमवारी रात्री तो व्यायाम करत असताना ही घटना घडल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला सलमानला उपचारासाठी अंबलावायल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्याला कोझिकोड येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे तो व्हेंटिलेटरवर होता. बुधवारी सकाळी त्याचे निधन झाले, असे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. अहवालात असे दिसून आले आहे की मृत्यूचे कारण अंतर्गत मेंदूतील रक्तस्त्राव होता.
येथे पाहा, घटनाचा व्हिडीओ:
View this post on Instagram
रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले कि, सोमवारी रात्री तो व्यायाम करत असताना अपघाती घटना घडली. या घटनेच्या व्हिडिओमध्ये तो तरुण जिममध्ये व्यायाम करताना कोसळताना दिसत आहे.