Visa | Pixabay.com

United Arab Emirates कडून भारतीय प्रवाशांना मिळणार्‍या visa-on-arrival programme मध्ये काही अपडेट्स करण्यात आले आहेत. आता सहा देशामधील वैध व्हिसा, residence permits किंवा Green Cards असणार्‍यांना भारतीयांना visa-on-arrival मिळणार आहे. भारतीय नागरिकांसाठी सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.  UAE मध्ये भारतीय सर्वात मोठा परदेशी समुदाय आहे आणि त्यांची संख्या सुमारे 35 लाख आहे. त्यामुळे यूएएई मध्ये आता प्रवास करणार्‍यांसाठी  ही आनंदाची बाब आहे.

युएई मध्ये कोणत्या प्रवाशांना मिळणार visa-on-arrival ची सुविधा ?

आहे त्यांना ही संधी मिळणार आहे. यापूर्वी अमेरिका, European Union member states आणि United Kingdom च्या व्हिसाधारकांना ही सोय दिली जात आहे.

पात्रता निकष

UAE चा visa-on-arrival पात्र होण्यासाठी, भारतीय नागरिकांनी UAE द्वारे निर्धारित केलेल्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये आगमनाच्या तारखेपासून किमान सहा महिन्यांच्या वैधतेसह वैध सामान्य पासपोर्ट असणे समाविष्ट आहे. प्रवाश्यांकडे यादीतील कोणत्याही पात्र देशांचा वैध व्हिसा, निवास परवाना किंवा ग्रीन कार्ड देखील असले पाहिजे. त्यांनी या आवश्यकता पूर्ण केल्यास, व्यक्तींना UAE इमिग्रेशन चेकपॉईंटवर आगमन झाल्यावर व्हिसा शुल्क भरावे लागेल.

व्हिसा फी काय असेल?

UAE ने पात्र भारतीय प्रवाशांसाठी नाममात्र व्हिसा शुल्कासह तीन श्रेणी सुरू केल्या आहेत. 4 दिवसांच्या व्हिसासाठी, प्रवाशांना Dh100 (अंदाजे रु. 2,270) मोजावे लागतील, तर 14 दिवसांच्या मुदतवाढीसाठी त्यांना Dh250 (अंदाजे रु. 5,670) द्यावे लागतील. 60 दिवसांचा व्हिसा देखील आहे, ज्यासाठी त्यांना Dh250 (अंदाजे रु. 5,670) द्यावे लागतील.