Mahakumbh 2025: कर्मचाऱ्याचा वर्क फ्रॉम महाकुंभमेळा, गर्दीत शांतपणे लॅपटॉपवर काम करणाऱ्या व्यक्तीचा फोटो व्हायरल
घरी बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामात लवचिकता असते. घरून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एक माणूस महाकुंभ मेळ्यात त्याच्या लॅपटॉपवर काम करत असल्याचे दिसून येत आहे. हा फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि तो महाकुंभमेळ्यातून काम करत असल्याचा दावा केला जात आहे. "जेव्हा तुम्हाला एकाच वेळी मोक्ष आणि पगार दोन्ही हवे असतात", असे पोस्टमध्ये लिहिले आहे.
Mahakumbh 2025: घरी बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामात लवचिकता असते. घरून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एक माणूस महाकुंभ मेळ्यात त्याच्या लॅपटॉपवर काम करत असल्याचे दिसून येत आहे. हा फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि तो महाकुंभमेळ्यातून काम करत असल्याचा दावा केला जात आहे. "जेव्हा तुम्हाला एकाच वेळी मोक्ष आणि पगार दोन्ही हवे असतात", असे पोस्टमध्ये लिहिले आहे, महाकुंभात लॅपटॉपवर काम करणाऱ्या व्यक्तीच्या एका हातात फोन धरून दुसऱ्या हाताने लॅपटॉपवर काम करत आहे. पवित्र स्नानानंतर कपडे बदलण्यात आणि फिरण्यात व्यस्त असलेल्या गर्दीत, हा कर्मचारी शांतपणे जमिनीवर बसून लॅपटॉपवर काम करत होता, ज्यामुळे आजूबाजूचे लोक आणि नेटिझन्स दोघेही खूप चकित झाल्याचेपाहायला मिळाले.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 19, 2025 03:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

