Maha Kumbh 2025: महाकुंभ मेळ्यातील अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असताना अनेक भाविक प्रयागराजला जात आहेत. दरम्यान, रेल्वेतील एक व्हिडीओ सध्या समोर येत आहेत. ज्यात चना विक्रेत्याला प्रवासी त्रास देत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये प्रवाशांच्या एका गटाकडून एका विक्रेत्याला त्रास दिला जात असल्याचे दिसून आले आहे. व्हिडिओमध्ये, ट्रेनमध्ये चना विक्रेता गर्दीतून मार्ग काढण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून येते, तर अनेक लोक तो विकत असलेले चणे घेतांना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये इतर लोक हसताना दिसत होते. ट्रेन प्रयागराजला जात होती की नाही हे निश्चित होऊ शकले नाही, परंतु ट्रेनमधील एका प्रवासी "महाकुंभ" म्हंटल्याचे ऐकू येत आहे. दरम्यान, विक्रेता चिडतो आणि प्रवाशांना रागावतो.

येथे पाहा व्हिडीओ: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)