Mumbai Mega Block On June 8: मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, 8 जून रोजीसाठी रेल्वेकडून मेगा ब्लॉक जाहीर, जाणून घ्या सविस्तर
शहरातील पश्चिम, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने 8 जून रोजी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे.
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवार 8 जून 2025 रोजी शहरातील पश्चिम, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने 8 जून रोजी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. ब्लॉक दरम्यान, ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीची कामे केली जातील. यावेळी सर्व स्लो मार्गावरील गाड्या फास्ट मार्गांवर धावतील. काही अप/डाउन उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही चर्चगेट गाड्या वांद्रे/दादर येथे शॉर्ट-टर्मिनेटेड/रिव्हर्स केलेल्या आहेत.
हार्बर लाईनवर सकाळी 10.33 ते दुपारी 3.48 पर्यंत पनवेलहून सीएसएमटीला जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 पर्यंत सीएसएमटीहून पनवेल/बेलापूरला जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ट्रान्स हार्बर लाईनच्या बाबतीत, सकाळी 11.02 ते दुपारी 3.35 पर्यंत पनवेलहून ठाण्याला जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर लाईन सेवा आणि सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 पर्यंत ठाण्याहून पनवेलला जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर लाईन सेवा रद्द राहतील. ब्लॉक काळात सीएसएमटी मुंबई-वाशी विभागात विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असतील. (हेही वाचा: Maharashtra Weather Update: पुढील 3 दिवस मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक ठिकाणी पाऊस आणि वादळाचा अंदाज; पहा जिल्हानिहाय अपडेट)
Mumbai Mega Block On June 8:
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2025 02:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

