
ॲपलच्या (Apple) स्वस्त आयफोनची (iphone) प्रतीक्षा अखेर संपली आहे. अॅपलने आज त्यांचा नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन iPhone 16e लाँच केला. आधी बातम्या येत होत्या की कंपनी 19 फेब्रुवारी रोजी iPhone SE 4 लाँच करणार आहे, परंतु आज कंपनीने हा फोन नवीन नाव आणि नवीन वैशिष्ट्यांसह लाँच केला. हा फोन 2022 मध्ये लाँच झालेल्या आयफोन एसई 3 चे अपग्रेडेड मॉडेल असेल. कंपनीने नवीन आयफोनमध्ये आयफोन 16 चे अनेक फीचर्स दिले आहेत. हे मॉडेल आयफोन 16 सिरीजमधील नवीनतम मॉडेल आहे. यामध्ये 6.1 इंच ओएलईडी स्क्रीन आणि ए18 चिप आहे. नवीन आयफोन 16ई आयफोन 15 प्रो (2023) आणि आयफोन 16 सिरीज सारख्या अॅपल इंटेलिजेंस वैशिष्ट्यांना सपोर्ट करतो. यात 48 मेगापिक्सेलचा सिंगल रिअर कॅमेरा आणि प्रोग्रामेबल अॅक्शन बटण आहे.
कॅमेरा-
अॅपल आयफोन लोकांमध्ये त्याच्या कॅमेऱ्यासाठी ओळखला जातो. कंपनीने आयफोन 16 मालिकेतील सर्व फोनमध्ये उत्तम कॅमेरे दिले आहेत आणि या फोनमध्येही त्याची काळजी घेण्यात आली आहे. Apple iPhone 16e ची किंमत कमी असूनही, कंपनीने त्यात एक उत्कृष्ट 48-मेगापिक्सेल फ्यूजन कॅमेरा दिला आहे. साधारणपणे अॅपल फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सिस्टम असते, परंतु अॅपल आयफोन 16ई मध्ये कंपनीने 2-इन-१ कॅमेरा सेटअप दिला आहे. येथे कंपनीने फक्त एक कॅमेरा लेन्स दिला आहे, परंतु त्यात 2x टेलिफोटोची सुविधा देखील आहे. यामुळे Apple iPhone 16e चा कॅमेरा नियमित ड्युअल कॅमेरा सेटअपइतकाच उत्तम बनतो.
इतर फीचर्स व बॅटरी-
कंपनीने Apple iPhone 16e मध्ये A18 चिप दिली आहे, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता मजबूत होते. त्याच वेळी, त्यात iOS 18 उपलब्ध असेल, ज्यामुळे फोनचे कार्य सुरळीत होते. एवढेच नाही तर कंपनीने त्यात सिलिकॉन तंत्रज्ञानाची बॅटरी दिली आहे, ज्यामुळे ती एकदा चार्ज केल्यावर बराच काळ चालते. त्याची बॅटरी Apple iPhone 11 पेक्षा 6 तास जास्त आणि Apple iPhone SE मालिकेतील सर्व फोनपेक्षा 12 तास जास्त चालेल.
एवढेच नाही तर, तुम्हाला Apple iPhone 16e मध्ये Apple Intelligence सिस्टम मिळेल, जो तुमचा वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करेल. हा फोन ChatGPT च्या पॉवरने सुसज्ज असेल. या फोनमध्ये 6.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले असेल. यामध्ये तुम्हाला IP68 रेटिंगचा स्प्लॅश, पाणी आणि धूळ प्रतिरोध मिळेल. (हेही वाचा: Instagram Teen Accounts in India: मेटा भारतामध्ये लाँच करणार 'इंस्टाग्राम टीन अकाउंट्स' फिचर; पालक ठेऊ शकणार मुलांच्या खात्यावर लक्ष, जाणून घ्या फीचर्स)
कलर, मेमरी व किंमत-
कंपनीने Apple iPhone 16e $599 च्या किमतीत लाँच केला आहे. भारतात त्याची सुरुवातीची किंमत 59,9000 रुपये ठेवण्यात आली आहे. लोक हा फोन 2,496 रुपयांच्या मासिक ईएमआयवर देखील खरेदी करू शकतील. यासाठी 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.30 वाजल्यापासून प्री-ऑर्डर करता येईल. हा फोन 28 फेब्रुवारीपासून अॅपल स्टोअरमध्ये उपलब्ध असेल.
Apple iPhone 16e 3 मेमरी सेटअपसह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 128 जीबी इंटरनल मेमरी असलेल्या फोनची किंमत 59,900 रुपये, 256 जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत 69,900 रुपये आणि 512 जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत 89,900 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन सध्या फक्त काळा आणि पांढरा अशा दोन रंगांमध्ये आणि मॅट फिनिशमध्ये उपलब्ध आहे.