Delta Airlines

Delta Airlines: टोरंटोच्या पिअर्सन विमानतळावर (Toronto Airport) लँडिंग करताना डेल्टा एअरलाइन्सचे (Delta Airlines) विमान उलटे झाले. गेल्या महिन्यात अमेरिकेत अनेक विमान अपघातांची नोंद झाली आहे आणि या यादीत भर म्हणजे कॅनडाच्या टोरंटोमधील पिअर्सन विमानतळावर डेल्टा एअरलाइन्सचे विमान कोसळले. टोरंटो विमानतळावर पोहोचताच डेल्टा एअरलाइन्सचे विमान उलटले आणि कोसळले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 18 जण जखमी झाले आहेत. मिनियापोलिसहून आलेल्या या विमानात  76 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. सोमवारी  हा अपघात दुपारी २:१५ वाजता घडला आणि कॅनेडियन विमानतळांपेक्षा जास्त प्रवाशांना वाहून नेणाऱ्या विमानतळावरील उड्डाणे सुमारे अडीच तासांसाठी ग्राउंड करण्यात आली.

येथे पाहा घटनेचा व्हिडीओ:

कॅनडाच्या हवामान खराब असल्यामुळे हा अपघात घडला आहे.  51 किलोमीटर प्रति तास वेगाने बर्फवृष्टी आणि वारे वाहत होते, जे ताशी 65 किलोमीटर वेगाने होते. तापमान उणे 8.6 अंश सेल्सिअस होते.  टोरंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॉवरमधील ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:10 वाजता विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु खराब हवामानामुळे हा अपघात झाला.