Photo Credit- X

Milind Rege Dies: मुंबई क्रिकेट संघाचे (Mumbai Cricket Team) माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन (Milind Rege Dies) झाले. मिलिंद रेगे यांनी मुंबई क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. मुंबई क्रिकेट संघाचे कर्णधार होते. याशिवाय, संघाचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी भूमिका पार पाडली होती. ते निवड समितीचे सदस्यही होते. त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणूनही भूमिका बजावली होती.

16 फेब्रुवारी 1949 ला मिलिंद रेगे यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबईकडून 967-68 ते 1977-78 या काळात प्रथम श्रेणी सामने खेळले होते. वानखेडे स्टेडियमवर खेळलेल्या गेलेल्या पहिल्या प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यातील मुंबई क्रिकेट संघाचाही ते भाग होते.

मिलिंद रेगे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ऑल-राउंडर असलेल्या मिलिंद रेगे यांना वयाच्या 26व्या वर्षीही हृदयविकाराचा झटका आला होता. परंतु, असे असतानाही ते क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा परतले. त्यांनी रणजी ट्रॉफीत मुंबईचे नेतृत्व केले होते. त्यांनी प्रथम श्रेणीचे एकूण 52 सामने खेळले. यात 126 विकेट्स आणि 23.56 च्या सरासरीने 1,532 धावा केल्या. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे त्यांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत. 2011 मध्ये त्यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. मात्र, 2012 मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.