
Tamil Nadu Horror: ओडिशातील एका 27 वर्षीय महिलेवर तिरुपूर येथे राहणाऱ्या बिहारमधील तीन कामगारांनी तिच्या पतीसमोर सामूहिक बलात्कार केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, तिघांनी प्रथम तिच्या पतीचे हात बांधले आणि एका निर्जन ठिकाणी चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, आरोपींपैकी एक अल्पवयीन असून 17 वर्षांचा मुलगा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला तिचा पती आणि त्यांच्या तीन वर्षांच्या मुलासह 17 फेब्रुवारी रोजी नोकरीच्या शोधात तिरुपूरला गेली होती.
सोमवारी रात्री पुष्पा जंक्शनजवळ चालत असताना तीन अनोळखी लोक आले त्यांनी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका खोलीत घेऊन गेले. रात्र होताच आरोपीने पतीला दोरीने बांधले आणि महिलेवर हल्ला करत तिच्यावर अत्याचार केला. महिलेने विरोध केला तेव्हा आरोपीने मुलाचा गळा कापण्याची धमकी दिली.
दुसऱ्या दिवशी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोहम्मद नदीम, मोहम्मद दानिश आणि 17 वर्षीय अल्पवयीन अशी तीन आरोपींना अटक केली. पीडितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.