PC-X

Mira Road Accident: मीरा रोडच्या (Mira Road) विनय नगर येथील जेपी नार्थ बार्सिलोना बिल्डिंग सोसायटीत रविवारी सकाळी साडे सहा वाजता गुंडागर्दीचा धक्कादायक प्रकार समोर आला. सोसायटीत रजिस्टर न केलेल्या गाडीला प्रवेश नाकारल्यावर कार चालक आणि त्याच्या साथीदारांनी थेट हल्ला केला. यावेळी संबंधिताने 8 जणांवर कार चढवली. या घटनेत तीन सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाले आहेत. (Washim: 7-8 फूट खोल नाल्यात पडून 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, वाशिम येथील घटना)

प्राथमिक माहितीनुसार, कशिश गुप्ता आणि त्याचा साथीदार अक्षित गुप्ता हे आरोपी आहेत. सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेश नाकारताच त्यांनी वाद घातला आणि देशी कट्ट्याच्या जोरावर धमकावले. यानंतर मद्यधुंध अवस्थेत त्यांनी सोसायटीच्या लोकांवर कार घालून धडक दिली.

मद्यधुंद चालकाकडून 8 जणांना कारने चिरडण्याचा प्रयत्न

घटनेनंतर मीरा रोड पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून, आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांचा वैद्यकीय अहवाल अजून मिळाला नाही. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी सांगतात की, आरोपींनी सुरक्षा रक्षकांना धमकावत ‘गाझियाबादची झांकी दाखवतो’ असे म्हणत धाक दाखवला. ही घटना सोसायटीतील सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस पुढील तपास करत असून, आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.