डर्बन सुपर जायंट्सच्या स्टार्स बरोबर अलीकडेच गप्पा गोष्टी 1xBetच्या इंस्टाग्राम पेजवर प्रसारित झाल्या जी किक्रेट प्रेमींसाठी एक पर्वणीच ठरली. 1xBet संघाची एसए20 2025 साठी संघाची अधिकृत प्रायोजक होती. कर्णधार केशव महाराज ज्याने टीमचे उत्तम पद्धतीने नेतृत्व केले, मॅथ्यू ब्रिट्झके ज्याने अलीकडे नवीन छंद (शुटींग) जोपासला आहे आणि केन विलियम्सन ज्यााने वयाच्या सहाव्या वर्षी व्यावसायिक क्रिकेपटू बनायचा निर्णय घेतला, या सर्वांनी एसए20च सिझन, ते कसे व्यावसायिक क्रिकेटपटू बनले, क्रिकेटच भविष्य आणि खेळापलीकडे त्यांच्या आवडी याबद्दल मोकळेपणाने गप्पा मारल्या.

मुले जी स्टार्स बनली

प्रत्येक खेळाडूची क्रिकेट बाबत वाटचाल वेगळी होती पण सर्व कहाण्यांमध्ये एक गोष्ट समान होती: असा क्षण जेंव्हा त्यांना ही जाणीव झाली की त्यांना व्यावसायिक क्रिडापटू बनायचे आहे.

केशव महाराजला ही जाणीव पहिल्यांदा वयाच्या सातव्या वर्षी तो किंग्जमीडला गेलेला असताना झाली. तेंव्हा तो स्वत:लाच म्हणलाा: “मला अस काही तरी बनायच आहे जो टीव्हीवर क्रिकेट खेळताना दिसणारा असेल”. केन विलियम्सनचा अनुभव असाच काही तरी होता. वयाच्या 7व्या अथवा 8व्या वर्षी तो पहिल्यांदा सामना पहायला गेला आणि डॅनियल व्हिटोरी बरोबर फोटोही काढला. नंतर केन व्हिटोरी बरोबर एकाच संघात खेळला आणि त्याने व्हिटोरीला त्या प्रसंगाची आठवणही करून दिली.

सहा वर्षांचा असताना मॅथ्यू ब्रिट्झकेला चेंजिंग रूम मध्ये जॅक्स कॅलिस बरोबर आयुष्य बदलणारा अनुभव आला. “त्या क्षणाने माझा दृष्टिकोन आणि मला काय बनायचे आहे याबाबत बदल झाला. तिथून मला व्यावसायिक क्रिकेटपटू बनायचय याची जाणीव झाली," ब्रिट्झके म्हणाला.

वडील कसे क्रिकेट खेळले आणि लहान असताना तो घराच्या मागच्या बाजूला कसा सराव करायचा त्याबद्दल विलियम्सन व्यक्त झाला. व्यावसायिक स्तरावर त्याचा प्रवास काही सोपा नव्हता परंतू जिद्द आणि खेळाबद्दल असलेल्या प्रेमामुळे त्याला एवढा प्रदीर्घ प्रवास करता आला. वजन आणि तंदुरूस्ती यामुळे आपल्याला कसा संघर्ष करावा लागला याबाबत महाराज व्यक्त झाला पण त्यातूनच तो कणखर बनला आणि जिद्दही तो शिकला. ब्रिट्झके आपली कौशल्य त्याचा भाऊ आणि वडीलांकडून शिकला आणि व्यावसायिक खेळाच्या मुख्य आव्हानाला तो आजही सामोरा जात आहे - कुटुंबापासून बराच काळ दूर राहणे.

त्यांच्या लहानपणच्या हिरोज बद्दल विचारल्यावर खेळाडूंनी अनेक महान क्रिकेटपटूंचा उल्लेख केला. ब्रिट्झकेने एबी डी व्हिलियर्स, अॅंड्य्रू कॉली आणि जॅक्स कॅलिसची निवड केली. विलियम्सनने कॅलिस बरोबर सचिन तेंडूलकर आणि रिकी पोंटिंग यांचाही उल्लेख केला. महाराजने आपल्या उत्तरात सचिन तेंडुलकरचाही समावेश केला.

असे विजय ज्यांनी ते बदलले

प्रत्येक खेळाडू अशा क्षणांबद्दल बोलले ज्याचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. ब्रिट्झकेने डर्बन सुपर जायंट्स बरोबरचा पहिला विजय निवडला जेंव्हा त्याच्या फलंदाजीचा संघाच्या यशात मोठा हात होता. महाराजसाठी तो क्षण तो वडील झाला तो होता: "त्यामुळे मी शांत झालो आणि आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला." आणि विलियम्सनने एक हलकाफुलका किस्सा सांगितला जेंव्हा त्याला पाच कप लेमोनेड टिमच्या सेलेब्रेशन्सचा भाग म्हणून प्यायला लागले.

SA20: संमिश्र भावना

केन विलियम्सनने हे आवर्जून सांगीतले की SA20 बाबत एक वेगळे वातावरण आहे आणि त्यांना फॅन्सचा प्रचंड पाठिंबा मिळतो. “SA20ची लोकप्रियता प्रचंड आहे आणि सर्व संघांचा चाहता वर्ग झटपट रूळला आहे. तस माझ हे पहिले वर्ष होते आणि अनुभव खूप छान होता आणि हा अनुभव आम्हाला जगभर विविध प्रकारे येत असतो. आपण भारतात जातो आणि क्रिकेट बद्दल तिथे असलेले प्रेम हे अफाट आहे आणि तिथे क्रिकेट बद्दल प्रेम असलेली एवढी लोकसंख्या आहे तिथे क्रिकेट खेळणेही एक पर्वणी असते".

खेळाडू खुल्या मनाने हे मान्य करतात की SA20 सीझन त्यांच्यासाठी सोपा नव्हता. "आम्ही काहीसे निराश आहोत कारण आम्ही खेळलेले क्रिकेट हे काही खास नव्हते पण जे काही घडते त्यामागे काही तरी कारण असते,” महाराज म्हणाला. परंतू त्याला चाहत्यांचा पाठिंबा जाणवला आणि तो त्याला दाद देतो.

"आमच्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे त्यांच्या पाठिंबा आणि प्रेमासाठी मनापासून आभार" आणि तुम्ही जे प्रेम आणि पाठिंबा या सिझनसाठी दाखवलात तो पुढच्या वर्षीही देत राहाल अशी मला अपेक्षा आहे. आणि मला आशा आहे की नजीकच्या भविष्यात आम्ही तुम्हाला आनंदाचा एखादा क्षण देऊ याची खात्री आहे", असे डर्बन सुपर जायंट्सचा कर्णधार म्हणाला.

संघ भावना आणि क्रिकेटला पाठिंबा

सघांच्या वातावरणाचे ब्रिट्झकेने छान असे वर्णन केले , आणि महाराज म्हणाला , “मला वाटत मनमोकळे होते”. कर्णधार म्हणाला की क्लबचे वातावरण एखाद्या कुटुंबाप्रमाणे होते: “ मला वाटत एखाद्या कुटुंबाप्रमाणे सगळ होत, शक्य झाले तेवढे सर्व एकमेकांच्या जवळ होते; एक संघ म्हणून आम्ही अनेक गोष्टी करतो. एक निराशाजनक सिझन होता, आम्हाला लोकांचा खूप पाठिंबा मिळाला आणि लोकांना सुपर जायंट्सबद्दला अजूनही प्रेम आहे त्यामुळे कुटुंब म्हणणच योग्य ठरेल.

क्रिकेटचा प्रदेशात विकास व्हावा, मुलांनी क्रिकेटची खेळ म्हणून निवड करावी आणि तरूण खेळाडूंसाठी संधी निर्माण व्हाव्यात यावर क्लबचा भर आहे.

"आमचे अनेक कम्युनिटी प्रोजेक्ट्स आहेत आणि विविध भागांपर्यंत आम्ही पोहचून खेळाच्या विकासासाठी प्रयत्नशील असतो. सुविधांवर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे आणि ते दिसत आहे. अशा सुविधांचा मुलांनी अनुभव घेऊन क्रिकेट काय आहे हे अनुभवले पाहिजे," असे महाराज म्हणाला.

तयारी आणि प्रेरणा

विलियम्सनने संघाच्या प्रशिक्षकांचा प्रदीर्घ अनुभव अधोरेखित केला ज्यामुळे खेळाडूंना सिझनच्या कठीण प्रसंगातही प्रोत्साहन मिळत राहीले. "आम्ही प्रत्येक सामन्याची तयारी ठरवून करतो आणि सर्वोत्तम खेळाचा प्रयत्न करतो," असे तो म्हणाला.

चाहत्यांकडून मोठी लक्ष ठरवून त्याच्या पूर्ततेसाठी कसे प्रयत्न करता आणि त्या प्रसंगी त्यांच्या मनात काय विचार असतो असा प्रश्न आल्यावर मॅथ्यू ब्रिट्झकेने उत्तर दिले की: “ तुम्हाला माहितीच असेल की संघात आम्हा प्रत्येकावर वेगळी जबाबदारी असते आणि एक फलंदाज माझी जबाबदारी ही फाऊल प्ले मध्ये संघाला चांगली सुरूवात करून देण्याची असते. आणि नशिबाने जर मी फाऊल प्ले मध्ये चांगली सुरूवात करू शकलो तर टिकून राहून रनरेट राखण्याचा आणि पाठलागात टिकून राहण्याच माझे लक्ष्य असते अस मला वाटत.”

क्रिकेट आणि भविष्याबाबत

केन विलियम्सन म्हणाला की क्रिकेट सतत बदलत परंतू त्याच्या मुळाशीही परत जात आहे. तरूण चाहत्यांमध्ये टी20 क्रिकेटची लोकप्रियता आणि जागतिक स्तरावर खेळाच्या विकसातील त्याची भूमिका त्याने अधोरेखित केली. “हे तुम्हाला माहितीच आहे की टी20 फॉर्मॅट किती प्रचंड लोकप्रिय आहे आणि तरूण पिढी त्याकडे मोठ्याप्रमाणावर आकर्षित होत आहे. त्यामुळे ते इथे टिकणार आहे आणि फ्रॅंचाईज प्रकार आता वार्षिक वेळापत्रकाचा मोठा भाग आहे आणि आंतरराष्ट्रिय क्रिकेट बरोबर कशाप्रकारे समन्वयाने ते वाटचाल करते आणि कोणते खेळाचे प्रकार खेळले जातात हे बघणे महत्त्वाचे आहे."

महाराज पुढे म्हणाला की भविष्यात नवीन तंत्रज्ञान विकसित होऊ शकते जसे लाईट पेटणारे बॉंड्री रोप्स अथवा लाइट पेटणारी हेल्मेट्स. तंत्रज्ञानाचा विचार केल्यास अनेक गोष्टी बदलत आहेत जसे खेळपट्टीसाठी एलईडी बांऊड्री लाइट्समुळे सामने अधिक रंजक होत आहेत.

वैयक्तिक आव्हाने आणि तरूण खेळाडूंसाठी सल्ला

इथल्या प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात कठीण प्रसंग आले. ब्रिट्झके म्हणाला की त्याच्या बांग्लादेश मधील पदार्पणात जेव्हा तो खेळण्याची अपेक्षाही नव्हती आणि किचकट खेळपट्टीने चार डावांनंतर पराभव झाला. हे एक मोठे आव्हान होते पण यामुळे आणखी एखादी संधी मिळून आपल्याला आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळावी अशी इच्छा त्याला निर्माण झाली.

महाराजने आपल्या पहिल्या भारत दौऱ्यातील आठवणीला उजळा दिला जिथे मोठ्या प्रमाणावर असलेल्या अपेक्षांचे आणि विशिष्ट परिस्थितीचे ओझे होते, ज्याचा स्पीन बॉलिंगवर परिणाम झाला. परंतू अनुभवामुळे तो अधिक परिपक्व झाला आणि प्रत्येक आव्हानातून संधी असते हे तो शिकला.

विलियम्सनने दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सामन्याचा अगदी आधीच्या दिवसातील अनुभव सांगीतला जेव्हा त्याच्या संघाला आंतरराष्ट्रीय पाताळीवर पराभव झाला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पातळी काय असते याची जाणीव झाली आणि भविष्यासाठी अधिक मोठी ध्येय त्याने नजरेसमोर ठेवली.

प्रदीर्घ अनुभव आणि अनेक आव्हानांना सामोरा गेलेल्या या खेळाडूंना तरूण क्रिकेटपटूंना काही सल्ला द्यायचा होता. केन विलियम्सन म्हणाला:"तुम्ही जे करता त्याची तुम्हाला गोडी असायला हवी आणि त्यासाठी तुम्हाला प्रेरणा आवश्यक आहे. जेंव्हा प्रेरणा ही आतून असते आणि त्यासाठी गोडीही आहे तेव्हा धैर्य हे आपोआप येते आणि कठीण परिस्थितीला तुम्ही सहज सामोरे जाऊन शकता आणि बघा तुम्ही कुठे पोहचला आहात. जर तुम्ही मेहनत करत राहणार आहात आणि त्यात काही आनंद असेल तर तुम्ही ते नक्कीच करणार".

केशव महाराज भर घालताना म्हणाला की: "इतर कोणाला दोष देण्याआधी आपल्यात सुधारणा करणे महत्त्वाचे आहे. यश मिळवण्याचा तोच मार्ग आहे."

डर्बन सुपर जायंट्सच्या खेळाडूंबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असेल जसे की ट्रेनिंग मध्ये सर्वात उशीरा कोण येत किंवा सर्वात जास्त कोण बोलत असतो अथवा संघाचा कर्णधार केशव महाराजचा आवडता खाद्य पदार्थ तर या थेटभेट आणि गप्पांच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ इथे बघू शकता 1xBet’s Instagram.

1xBet बाबत

1xBet ही जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त बुकमेकर आहे आणि 18 वर्षांपासून सट्टेबाजी उद्योगात आहेत. ब्रँडचे क्लायंट हजारो स्पोर्टिंग इव्हेंटवर बेट लावू शकतात, कंपनीची वेबसाइट आणि ॲप 70 भाषांमध्ये उपलब्ध आहे. 1xBet च्या अधिकृत भागीदार यादीमध्ये FC Barcelona, Paris Saint-Germain, LOSC Lille, La Liga, Serie A आणि इतर प्रसिद्ध स्पोर्ट्स ब्रँड आणि संस्थांचा समावेश आहे. कंपनीच्या भारतीय अंबॅसिडर्स मध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू सुरेश रैना, शिखर धवन,हेंरिक क्लासेन आणि अभिनेत्री उर्वषी रोतेला हे आहेत. कंपनी वारंवार IGA, SBC, G2E Asia आणि EGR Nordics Awards सारख्या प्रतिष्ठित व्यावसायिक पुरस्कारांची नॉमिनी आणि प्राप्तकर्ता आहे.