Regional Rapid Transit System (Photo Credits-ANI)

भारतातील सार्वजनिक ट्रान्सपोर्टचे स्वरुप बदलत आहे. याच पार्श्वभुमीवर रिजनल Regional Rapid Transit System (आरआरटीएस) ट्रेनचा पहिला लूक शुक्रवारी लोकांसमोर आला आहे. या ट्रेनचा पहिला लूक पाहून तुम्ही सुद्धा खुश व्हाल. 180 किमी तास वेगाने धावणारी मेट्रो आणि बुलेट ट्रेनसारखी सुविधा देणारी रॅपिड ट्रेन तुमच्यासमोर आता झळकली आहे.(Rafale Squadron's First Woman Pilot: बनारसची कन्या शिवांगी सिंह होणार राफेल विमानाची पहिली महिला पायलट; लहानपणापासूनच पाहिले होते वैमानिक होण्याचे स्वप्न)

केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी शुक्रवारी भारतातील पहिली रीजनल रॅपिड ट्रांजिट सिस्टिम ट्रेनच्या फर्स्ट लूकचे अनावरण केले आहे. या वेळी एनसीआरटीसीचे प्रबंध निर्देशक विनय कुमार सिंह आणि एनआरटीसीच्या बोर्डचे सदस्य सुद्धा उपस्थितीत होते. तसेच मंत्रालय, एनसीआरटीसी आणि बॉम्बिर्डियरचे वरिष्ठ अधिकारी ही दिसून आले. 180 किमी प्रति तास वेगाने धावणारी आरआरटीएस ट्रेन भारतात प्रथम आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे.(First Woman Pilot In Indian Navy: भारतीय नौदलात सब लेफ्टनंट शिवांगी पहिल्या महिला पायलट म्हणून सामील; जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायक प्रवासाबद्दल)

स्टेनलेस स्टिल पासून तयार करण्यात आलेली एरोडायनामिक ट्रेन हलकी असण्यासह पूर्णपणे वातानुकूलित असणार आहे. प्रत्येक कोचमध्ये प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी 'प्लग-इन' पद्धतीचे सहा स्वयंचलित दरवाजे असणार आहेत. तसेच बिझनेस क्लास कोचमध्ये असे चार दरवाजे असणार आहे.

सार्वजनिक वाहतूकीला चालना देण्यासाठी प्रत्येक ट्रेनमध्ये एक बिझनेस क्लास कोच असणार आहे. बिझनेस क्लासच्या कोचच्या आतमध्ये फूड डिस्पेंडिंग मशीन सुद्धा असणार आहे. आरआरटीएस ट्रेनमध्ये 2X2 ट्रान्सवर्स आरामदायक सीट, प्रवाशांना पाय ठेवण्यासाठी पुरेशी जागा, उभे राहून प्रवास करणाऱ्यांसाठी दोन सीटच्या मध्ये पुरेशी जागा, सामान ठेवण्यासाठी रॅक, मोबाईल/लॅपटॉप चार्जिंग सॉकेट, वायफाय आणि अन्य काही सुविधा सुद्धा उपलब्ध असणार आहेत.(Navy's First Women Combat Aviators: सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि रिती सिंग या 2 महिला अधिकाऱ्यांची इतिहासामध्ये पहिल्यांदाचं नौदलाच्या हेलिकॉप्टर तुकडीमध्ये Observers म्हणून नियुक्ती)

आरआरटीएस ट्रेनचे डिझाइन नवी दिल्लीतील प्रतिष्ठित लोटस टेम्पल पासून प्रेरित आहे. लोटस टेम्पल एक उर्जा-कुशल इमारतीचे प्रतीक आहे. कारण याचे डिझाइन प्रकाश आणि वायुच्या प्राकृतिक प्रवाहाला कायम ठेवतो. याच पद्धतीने आरआरटीएस ट्रेनमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा प्रकाश आणि तापमान नियंत्रण प्रणाली असणार आहे. जी कमी उर्जेत सुद्धा प्रवाशांना आरामदायक अनुभव देणार आहे. आधुनिक सुविधांपेक्षा कमी असणारी आरआरटीएस ट्रेन नव्या युगातील तांत्रिक आणि भारतच्या समृद्ध परंपरेचे एका अनमोल ठेवा असणार आहे.