Navy's First Women Combat Aviators: सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि रिती सिंग या 2 महिला अधिकाऱ्यांची इतिहासामध्ये पहिल्यांदाचं नौदलाच्या हेलिकॉप्टर तुकडीमध्ये Observers म्हणून नियुक्ती
Sub Lt. Riti Singh and Sub Lt. Kumudini Tyagi (Photo Credits: PTI)

Navy's First Women Combat Aviators: भारतीय नौसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाचं दोन महिल्यांची नौदलाच्या हेलिकॉप्टर तुकडीमध्ये ऑबर्झर्व्हर (Observers) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी (Sub Lieutenant Kumudini Tyagi) आणि सब लेफ्टनंट रिती सिंग (Sub Lieutenant Riti Singh) असं या महिला अधिकाऱ्यांचं नाव आहे.

कुमुदिनी त्यागी आणि रिती सिंग या दोन्ही महिला अधिकारी यापुढे आयएनएस गरुडा या युद्धनौकेवरील हेलिकॉप्टरच्या पायलेट म्हणून काम करणार आहेत. आत्तापर्यंत कोणत्याही महिला अधिकाऱ्याला युद्धनौकेवर दीर्घकाळासाठी तैनात करण्यात आलेलं नाही. परंतु, आता इतिहासात पहिल्यांदा या दोन महिला अधिकाऱ्यांना नौदलाच्या हेलिकॉप्टरवर तैनात करण्यात आलं आहे.

सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि रिती सिंह हे भारतीय नौदलाच्या 17 अधिकाऱ्यांच्या गटाचा एक भाग आहेत. या गटाच्या अधिकाऱ्यांमध्ये चार महिला अधिकारी आणि भारतीय तटरक्षक दलाच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कोची येथील आयएनएस गरुड येथे आज झालेल्या समारंभात त्यांना “निरीक्षक” म्हणून नियुक्त करण्यात आले असून त्यांना “विंग्स” देण्यात आले आहेत. या गटातील चार महिला अधिकारी शॉर्ट सर्व्हिस कमिशन बॅचमधील आहेत, तर उर्वरित 13 अधिकारी नियमित बॅचचे आहेत. (हेही वाचा - Coronavirus Vaccine: लस निर्मितीनंतर भारतात कोरोना व्हायरस लगेच संपेल? तेवढी वितरण प्रणाली सक्षम आहे काय?)

दरम्यान, कुमुदिनी त्यागी आणि रिती सिंह यांना या कार्यक्रमात रीअर अ‍ॅडमिरल अँटनी जॉर्ज एन.एम. यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी जॉर्ज यांनी पात्र ठरलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केलं. प्राप्त माहितीनुसार, लेफ्टनंट त्यागी आणि सब लेफ्टिनेंट सिंह आता मध्यम-रोल हेलिकॉप्टर, एमएच-60 आर वर प्रशिक्षण घेतील. विशेष म्हणजे भारताने या स्वरुपाचे 24 हेलिकॉप्टर अमेरिकेतून मागितले आहेत.